महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कामाचा जाब विचारल्याने कामगाराचा आत्मदहनाचा प्रयत्न - पाणी पुरवठा विभाग ठाणे बातमी

पोलिसांनी वेळेतच घटनास्थळी धाव घेऊन कामगाराला पकडल्याने तो बचावला आहे. ही घटना उल्हासनगर येथील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाबाहेर घडली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा गायकवाड असे त्या कामगाराचे नाव आहे.

worker-suicide-attempt-in-thane
worker-suicide-attempt-in-thane

By

Published : Jan 25, 2020, 4:55 PM IST

ठाणे- कामगाराला अनधिकृत नळ जोडणीचा जाब अधिकाऱ्याने विचारला. त्यानंतर झालेल्या वादातून कामगाराने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली. पोलीस वेळेत दाखल झाल्याने कामगाराला वाचवण्यात यश आले आहे.

हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या आजचे दर

पोलिसांनी वेळेतच घटनास्थळी धाव घेऊन कामगाराला पकडल्याने तो बचावला आहे. ही घटना उल्हासनगर (कॅम्प नं. ५ )येथील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाबाहेर घडली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा गायकवाड (वय ५७) असे त्या कामगाराचे नाव आहे.

कृष्णा उल्हासनगर महापालीकेच्या पाणीपूरवठा विभागात कार्यरत आहे. सकाळी दहाच्या सुमारास ते कॅम्प नं. ५ येथील पाणीपूरवठा कार्यालयात कामावर हजर होता. दरम्यान, पाणीपूरवठा अधिकारी विजय मंगलानी यांनी कृष्णा यांना सुट्टीच्या कालावधीमध्ये अनधिकृतपणे नळ जोडणीचा जाब विचारला. याचा राग आल्याने कृष्णाने मंगलानी व शाखा अभियंता राजेश वानखेडे तसेच फिटर मानकर यांना शिवीगाळी केली. मंगलानी यांनी कृष्णाला कार्यालयाच्या बाहेर बसण्यास सांगितले. संतापलेल्या कृष्णाने बाहेर न बसता रस्त्यावर जावून पेट्रोल अंगावर ओतून घेतले. पेटवून घेण्याआधी त्यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात फोन करून मी जाळून घेऊन आत्महत्या करीत असल्याचे सांगितले.

पोलीस निरिक्षक राजेंद्र मायने यांना याची माहिती मिळताच ते पोलीस उप निरिक्षक धूम यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वेळीच कृष्णा गायकवाडला वाचवले. कृष्णा गायकवाड याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details