महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात पाणी प्रश्नावरून महिला आक्रमक, शिवसेनेची प्रचार रॅली अडवली - विधानसभा २०१९

ओवळा-माजिवडा मतदार संघातील वर्तकनगर-चिरागनगरच्या रहिवाशांची गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. त्यामुळे येथील मतदार आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांची रॅली अडवून या मतदारसंघातील महिलांनी त्यांना जाब विचारला.

ठाण्यात पाणी प्रश्नावरुन महिला आक्रमक,

By

Published : Oct 16, 2019, 10:58 AM IST

Updated : Oct 16, 2019, 11:23 AM IST

ठाणे - विधानसभा निवडणुकीत देशभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावाने प्रचाराचे ढोल बडवले जात आहेत. मात्र, दुसरीकडे नागरिकांच्या मूलभूत सोईसुविधा आणि समस्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. ओवळा-माजिवडा मतदार संघातील वर्तकनगर-चिरागनगरच्या रहिवाशांची गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. त्यामुळे येथील मतदार आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांची रॅली अडवून या मतदारसंघातील महिलांनी त्यांना जाब विचारल्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरात नागरीकरण वाढत आहे. ठाणे महापालिकेने इतर पायाभूत सुविधा पुरवल्या असल्या तरी, स्वतःचे धरण नसल्याने पालिकेला पाण्यासाठी दुसऱ्या प्राधिकरणावर अवलंबून राहावे लागते. यंदा धो-धो पाऊस कोसळूनही ठाण्यात अधिकृतपणे 30 टक्के पाणी कपात केली जाते. याशिवाय पाणीगळती आणि पाणी चोरीमुळे पाणीकपातीचा त्रास नागरिकांना सोसावा लागत असतो. महापालिकेचे प्राधिकरण असलेल्या स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीच्या वतीने दर बुधवारी व शुक्रवारी शटडाऊन घेतल्याने पुढचे दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते.

ठाण्यात पाणी प्रश्नावरून महिला आक्रमक

हेही वाचा - एकनाथ खडसेंना व्हायचंय पंतप्रधान!

हेही वाचा -मला मोदी-शाहांची काळजी वाटते, झोपेतसुद्धा ते माझ्या नावाने चवताळून उठत तर नसतील ना? - पवार

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदार संघातील वर्तकनगर-चिरागनगर भागात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. येथील लोकसंख्या १२ हजारांच्या आसपास असून, येथे शिवसेनेचे ४ नगरसेवक आहेत. तरीही, या पाणी समस्येकडे ठाणे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच, या भागात प्रचाराला येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पाणी पाजण्याचा इरादा नागरिकांनी व्यक्त केला आहे. तर, या भागातील महिला वर्गाने शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांची रॅली अडवून त्यांना जाब विचारला. अतिरिक्त पाणीपुरवठा बड्या मॉल आणि ज्युपीटरसारख्या रुग्णालयांना पुरवल्याने वर्तकनगरच्या काही भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


स्मार्ट ठाण्यात नागरीकरणात वाढ अन, पाणी पुरवठ्यात घट
ठाण्यात दिवसेंदिवस नागरीकरण वाढत असतानाही पाणी पुरवठा मात्र तुलनेने घटला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. ठाणे शहराला विविध प्राधिकरणामधून होणारा पाणीपुरवठा पाहिल्यास 'ठाणे तिथे पाणी उणे' असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सद्य स्थितीत महापालिकेच्या स्टेम प्राधिकरणामार्फत 110 एमएलडी, एमआयडीसकडून 110 एमएलडी, बृहन्मुंबई महापालिकेच्या माध्यमातून 60 एमएलडी आणि ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतुन 200 एमएलडी पाणीपुरवठा होतो.

Last Updated : Oct 16, 2019, 11:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details