महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईटिव्ही भारत' विशेष - पाणीटंचाईला पाझर खड्ड्यांचा पर्याय - Women overcome water scarcity

जिल्ह्यात धरणाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्यातील गावे तसेच आदिवासी पाड्यांना गेल्या महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ठाणे जिल्हा परिषदेकडून सध्या तीन टँकरने तालुक्यातील काही टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र येथील महिलांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाझर खड्ड्यांचा पारंपरिक पर्याय शोधला आहे.

पाणीटंचाईला पाझर खड्ड्यांचा पर्याय
पाणीटंचाईला पाझर खड्ड्यांचा पर्याय

By

Published : Mar 13, 2021, 8:55 PM IST

ठाणे -जिल्ह्यात धरणाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्यातील गावे तसेच आदिवासी पाड्यांना गेल्या महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ठाणे जिल्हा परिषदेकडून सध्या तीन टँकरने तालुक्यातील काही टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र सर्वच वाड्या वस्त्यांवर टॅंकरने पाणीपुरवठा करणे अशक्य आहे. मात्र येथील महिलांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाझर खड्ड्यांचा पारंपरिक पर्याय शोधला आहे.

नैसर्गिक जलक्षेत्राजवळील जमिनीत पाझर खड्डे खोदून त्यातून पाणि मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, अशा पद्धतीने हंडाभर पाणी मिळवण्यासाठी तब्बल 1 तासांचा कालावधी लागतो, मात्र दुसरा पर्याय नसल्याने महिला अशा पद्धतीने पाण्यासाठी पाझर खड्ड्याचा उपयोग करत आहेत. मात्र वाढत्या उन्ह्याच्या तिव्रतेसोबतच हे पाझर खड्डे देखील आता अटू लागले आहेत.

दूषित पाण्यामुळे साथरोगाची भीती

शहापूर तालुक्यातील कोळीपाडा, उठावा, वारली पाडा, वरचा गायदरा, अजूनप, दांड, नारळवाडी, पारधवाडी, चिंतामण वाडी , बिबडवाडी, वाशाळा , सखाराम पाडा , रायची वाडी, खरमे पाडा, वेळूक , तानसा , सावरदेव, कानगाव ,धामणी, गोलभण, टोकरवाडी विहिगाव, ढाकणे , धुपरवाडी, नडगाव (सो.) चाफ्याचीवाडी, शीळ, विठ्ठलगावं, चेरवली, कानवे, ऊंबरवाडी, ताईचीवाडी, गेगांव, रायकरपाडा, कानडी, झापवाडी , खरीड, भुईशेत, खोस्ते, भावसे, टहारपूर, पेंढारी, तसेच डोळखांब भागातील साकबबाव, जूनवाडी, किन्हवली परीसरातील टाकीपठार, मानेखिंड, या गाव पाड्यातील महिला पाणी मिळवण्यासाठी पाझर खड्ड्यांचा उपयोग करत आहेत. मात्र कधिकधि अशा खड्ड्यांमधून मिळणारे पाणी हे दुषित देखील असते. त्यामुळे कावीळ, अतिसार आणि तापाचा साथरोग पसरण्याची भीती आहे.

पाणीटंचाईला पाझर खड्ड्यांचा पर्याय

जिल्हा परिषद अध्यक्षांकडून पहाणी

शहापूर तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईने जिल्हा प्रशासनाचे देखील लक्ष वेधले असून, शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे यांनी खर्डी, कसारा, वाशाळा, डोळखांब, साकडबाव, तळवाडा, टाकीपठार या भागातील टंचाईग्रस्त गावे आणि आदिवासी पाड्यांची पाहाणी केली. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते. पाणी समस्येवर प्रशासनाच्या मदतीने तोडगा काढू असे अश्वासन त्यांनी यावेळी दिले. दुसरीकडे शहापूरमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीवर ठाणे जिल्हाधिकारी हे देखील भिवंडी उपविभागीय महसूल अधिकारी व स्थानिक तहसीलदारांच्या माध्यमातून लक्ष ठेवून असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details