ठाणे- कोकण कन्या एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना एका महिलेने बाळाला जन्म दिला आहे. पूजा मुन्ना चौहान (वय २०) असे रेल्वेत बाळांतपण झालेल्या महिलेचे नाव आहे. तिने एका मुलाला जन्म दिला असून बाळ आणि आई दोघेही सुखरुप आहेत.
ठाणे स्टेशनवर महिलेने दिला बाळाला जन्म, प्रवासादरम्यान सुरु झाल्या होत्या प्रसुतीकळा - konkan
सकाळी ५.४० वाजता गर्भवती असलेल्या पूजा चौहान यांना प्रवासादरम्यान प्रसुतीकळा सुरू झाल्या होत्या.
बाळ आणि आई
आज सकाळी ५.४० वाजता गर्भवती असलेल्या पूजा चौहान यांना प्रवासादरम्यान प्रसुतीकळा सुरू झाल्या. त्यानंतर तात्काळ ट्रेन ठाणे स्थानकात थांबविण्यात आली. वन रुपी क्लिनिकचे कर्मचारी महिलेची प्रसुती करण्यासाठी तत्काळ दाखल झाले. ठाणे स्थानकातच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
Last Updated : Apr 27, 2019, 4:01 PM IST