महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वयंपाक करण्याच्या वादातून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या - राम मधनी अपारमेंट

घरात स्वयंपाक करण्यावरून झालेल्या वादातून एका ३० वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मृतक नीतूचे छायाचित्र

By

Published : Jul 3, 2019, 4:59 PM IST

ठाणे - घरात स्वयंपाक करण्यावरून वाद झाल्याने ३० वर्षीय विवाहितेने राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील कामत घर परिसरातील राम मधनी सदनिकेमध्ये घडली आहे. नीतू अभयराज सिंग, असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत नीतूचे २६ एप्रिल २०१२ रोजी अभयराज यांच्याशी विवाह झाला होता. तिला एक पाच वर्षांचा मुलगा व दोन वर्षांची मुलगी अशी २ अपत्य आहेत. काल सकाळच्या सुमारास तिचे सासू व छोटी जाऊ यांच्याशी स्वयंपाक करण्यावरून वाद झाला होता. त्या रागाच्या भरात तिने बेडरूममध्ये जाऊन छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात केली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मारुती कारवार करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details