ठाणे - ठाण्यातील मनोरमानगर येथे एका महिलेची छेड काढल्याप्रकरणी एका मद्यपीला भाजपा महिला मोर्चाच्या महिलांनी बेदम चोप दिली. छेड काढल्याप्रकरणी पीडित महिलेने मद्यपीच्या कानाखाली मारली. त्यानंतर मद्यपीने दारूच्या नशेत महिलेला लाथा-बुक्या मारत मारहाण केली. हा प्रकार पाहणाऱ्या नागरिकांनी आणि महिलांनी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेत चांगलीच अद्दल घडवली. चोप दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करुन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आहे. महिलांची छेड काढणाऱ्यांना सोडले जाणार नाही. त्यांनाही असाच चोप दिला जाईल, असा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी दिला आहे.
महिलेची छेड काढणाऱ्या मद्यपीला महिलांनी दिला चोप - कापूरबावडी पोलीस ठाणे
रस्त्यावर महिलेची छेड काढून तिला मारहाण करणाऱ्या मद्यपीला काही महिलांनी चांगलीच अद्दल घडवली. भाजपा महिला मोर्चाच्या महिलांच्या सहाय्याने काही महिलांनी मद्यपीला चोप दिली. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मद्यपीला दिला चोप
गुन्हा दाखल, आरोपी अटकेत -
याप्रकरणात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे वर्तन केल्यास आरोपीला अशीच शिक्षा देण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली. तसेच कायद्याच्या चौकटीत राहून आपण कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Last Updated : Jul 7, 2021, 6:53 PM IST