महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण - policeman saved womans life in thane

ठाणे रेल्वे स्थानकावर तोल जाऊन रेल्वे प्लॅटफाॅर्मवर पडलेल्या महिलेचा जीव पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला आहे. धनवती राजू भारद्वाज असे या महिलेचे नाव असून ती मुंबईमध्ये एका कामानिमित्त आली होती.

ठाणे रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण
womans life saved due to alert policeman at thane railway station

By

Published : Jan 9, 2021, 5:32 PM IST

ठाणे -पोलिसांच्या सतर्कतेमुळे ठाणे रेल्वे स्थानकावर एका महिलेचा जीव वाचला आहे. ही महिला धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी महिलेचा तोल जाऊन ती महिला रेल्वे प्लॅटफाॅर्मवर पडली. रेल्वेगाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या फटीमध्ये ही महिला सापडणार होती. इतक्यात तेथे उभे असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पवार आणि अब्दुल सत्तार या दोघांनी त्या महिलेला रेल्वेखाली जाण्याआधीच बाहेर खेचले, त्यामुळे तिचा जीव वाचला. धनवती राजू भारद्वाज असे या महिलेचे नाव असून ती मुंबईमध्ये एका कामानिमित्त आली होती.

घटना सीसीटीव्हीत कैद

वारंवार सांगूनदेखील प्रवासी जीव धोक्यात टाकतात -

वारंवार रेल्वेस्थानकावर अशा घटना घडत आहेत. प्रवासी गाडीमध्ये लवकर चढण्याच्या घाईत किंवा गाडीतून उतरण्याच्या घाईत त्यांचा तोल जातो आणि ते रेल्वे प्लेटफाॅर्मवर पडतात. त्यानंतर रेल्वेखाली येऊन त्यांचा मृत्यू होण्याचे शक्यता असते. अनेक वेळा रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या पोलिसांनी प्रवाशांचा जीव वाचलेला आहे. त्यामुळे धावत गाडीमधून कोणीही उतरू नये किंवा धावती गाडी कोणीही पकडू नये, असे वारंवार सांगूनदेखील प्रवासी मात्र त्यांचा जीव धोक्यात टाकून अशा पद्धतीने रेल्वे प्रवास करतात.

हेही वाचा - 'बालकांचे मृत्यू नाही तर हत्याच' ; याला सरकारच जबाबदार असल्याचा भाजपा नेत्यांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details