ठाणे -अंधश्रद्धेपोटी एका २८ वर्षीय महिलेला जबर मारहाण करून तिचे डोक्याचे केस कापल्याची घटना भिवंडीतील अंजूरफाटा परिसरात घडली. पीडित महिलेने भोंदूबाबा आणि त्याच्या साथीदारांच्या तावडीतून सुटका करून घेत नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी, पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून चारही आरोपी फरार आहेत. मनोज गोहिल, त्याची पत्नी जया गोहिल, विनोद चव्हाण आणि गुजराथी महाराज, अशी आरोपींची नावे आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला भिवंडीतील कामातघर परिसरात पतीसह राहत होती. दरम्यान, आरोपी मनोज गोहिलशी तिचे प्रेमसंबध जुळल्याने ती आरोपी मनोज बरोबर राहू लागली. काही महिन्यांपूर्वी आरोपी मनोज विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात पीडित महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी मनोज जामीनावर सुटून आला. त्यानंतर पीडित महिला पुन्हा त्याच्यासोबत राहू लागली.