महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Married Woman Murder : महिलेची हत्या, नवरा सोडून गेली होती दुसऱ्यासोबत राहायला - Married Woman Murder

नवऱ्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेची हत्या (Married Woman Murder) झाल्याची घटना (woman strangulated to death in Thane) आज सकाळच्या सुमारास घडली. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी फाटा परिसरातील एका चाळीत घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे मृत महिला ज्या व्यक्तीसोबत राहत होती, त्यानेच तिची हत्या करून पळ काढल्याचा (Man Killed woman and escaped) संशय पोलिसांनी व्यक्त केला. Latest news from Thane, Thane Crime

Married Woman Murder
महिलेची हत्या

By

Published : Nov 7, 2022, 6:10 PM IST

Updated : Nov 7, 2022, 7:09 PM IST

ठाणे : नवऱ्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेची हत्या (Married Woman Murder) झाल्याची घटना (woman strangulated to death in Thane) आज सकाळच्या सुमारास घडली. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी फाटा परिसरातील एका चाळीत घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे मृत महिला ज्या व्यक्तीसोबत राहत होती, त्यानेच तिची हत्या करून पळ काढल्याचा (Man Killed woman and escaped) संशय पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल (murder case filed Thane) करून आरोपीचा शोध पोलिसांनी सुरु केला. विक्की बबन देवकते असे फरार आरोपीचे नाव आहे. तर लक्ष्मीबाई मनोहर तायडे (वय ३७) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. Latest news from Thane, Thane Crime

मृतक महिलेचे शव पोलिसांनी घेतले ताब्यात


दिवसापूर्वी आरोपी सोबत :पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मृत महिला ४ ते ५ दिवसापूर्वीच आरोपी विक्की सोबत नेवाळी फाटा भागातील साईबाबा चाळीत राहण्यास आली होती. ती मूळची अकोला जिल्ह्यातील पिंपळखुंटे गावात राहणारी होती. त्यातच आज सकाळी सात वाजल्याच्या सुमारास तिचा मृतदेह ती राहत असलेल्या घरात आढळून आला. तर तिच्यासोबत राहणारा विक्की पसार झाला होता. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी हिललाईन पोलिसांना देताच पोलीस पथक काही वेळातच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत लक्ष्मीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर मधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रवाना केला.


लक्ष्मीची गळा आवळून हत्या :विशेष म्हणजे मृत लक्ष्मी व विक्की चाळीत एकत्र राहत होते. मात्र दोघांचे नातेसंबंध काय? हे अद्यापही समोर आलेले नाही. दुसरीकडे लक्ष्मीची हत्या गळा आवळून झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात समोर आल्याने हिललाईन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला. विक्की हा म्हाडामध्ये वाहनचालक म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली असून आरोपीच्या शोधासाठी दोन पथक हिललाईन पोलिसांची रवाना झाले आहे.


हत्येचे कारण गुलदस्त्यात -दरम्यान मृत लक्ष्मीच्या नातेवाईकांचा पोलीस शोध घेत असून विक्कीने तिची हत्या कोणत्या उद्देशाने केली याचे कारण आरोपी पकडल्यानंतरच समोर येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली आहे.

Last Updated : Nov 7, 2022, 7:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details