महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Woman Set On Fire In Thane : धक्कादायक! प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून विवाहितेला जिवंत जाळत ठार मारणाऱ्या प्रियकरासह मित्राला अटक

Woman Set On Fire In Thane : २५ वर्षीय विवाहितेने प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रियकराने त्याच्या मित्राच्या मदतीने विवाहितेच्या राहत्या घरात जाऊन तिच्यावर रॉकेल ओतून जिवंत पेटवून (Married woman set on fire) दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील माणकोली गावात घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात प्रियकरासह त्याच्या मित्रावर हत्येसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

Woman Set On Fire In Thane
विवाहितेला जिवंत जाळले

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 9:44 PM IST

ठाणे Woman Set On Fire In Thane : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर व त्याचा मित्र यांना अटक केलेली आहे. मृतक २५ वर्षीय पीडिता मूळची उत्तर प्रदेश राज्यातील असून आरोपी प्रियकर सुनिजर हाही त्याच गावात राहात होता. (boyfriend and friend arrested) दोघांची ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र पीडितेच्या आई-वडिलांनी तिचा विवाह भिवंडीतील गोदाम पट्ट्यात काम करणाऱ्या मूळचा उत्तरप्रदेश मध्ये राहणाऱ्या तरुणाशी ७ वर्षांपूर्वी करून दिला होता. त्यानंतर काही महिन्याने भिवंडी तालुक्यातील माणकोली येथे एका खोलीत पती पत्नी राहत असतानाच त्यांना एक मुलगाही झाला. त्यातच पूर्वीचा प्रियकर आरोपी याचे मृतक पीडितशी पूर्वीपासून प्रेमसंबंध होते.

रॉकेल ओतून पेटविले आणि झाले फरार :मागील महिन्यापूर्वी पीडितेनं प्रेमसंबंध तोडले होते. त्यामुळे याच रागातून त्याने पीडित विवाहितेला माझ्याशी पूर्वी सारखंच प्रेम कर. नाहीतर तुझ्या मुलाला ठार मारेल अशी धमकी दिली होती. मात्र, मृतक पीडित विवाहास त्याला नकार देत असल्याचं पाहून आरोपीने त्याच्या मित्राच्या सोबतीनं १९ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजताच्या सुमारास पीडित ती राहत असलेल्या मानकोली गावातील घर गाठले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी आपसात संगनमत करून पीडितेच्या घरात घुसून तिच्यावर रॉकेल ओतून जिवंत पेटवून दिलं. यानंतर दोघेही घटनास्थळावरून फरार झाले होते.

मुलाला मूळगावी घेऊन जाण्याचा मेसेज :या घटनेत पीडित विवाहिता ४० ते ४५ टक्के आगीत होरपळी होती. दरम्यान, पीडिता आगीत गंभीरपणे भाजल्याने तिला मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ती बोलण्याच्या स्थितीत आल्याने तिच्या फिर्यादीवरून दोघा आरोपी विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात सुरुवातीला भादंविच्या कलम ३०७, ४५२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, ३० ऑक्टोबर रोजी उपचारा दरम्यान पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. विशेष म्हणजे, ज्या दिवशी तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला त्या दिवशी तिने पतीला शेवटचा मोबाईलवर मेसेज पाठवून आपल्या मुलाला येथे ठेवू नका. त्याला मूळगावी घेऊ जा, असं म्हटलं होतं. अशी माहिती मृत पीडितच्या पतीने दिली.

दोन्ही आरोपींना अटक:दुसरीकडे दोन्ही आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोध सुरू केला. पोलिसांनी फरार प्रियकरासह त्याच्या मित्राला ३१ ऑक्टोबर रोजी भिवंडी शहरातील पद्मानगर परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. दोघा आरोपींना न्यायालयात हजर केलं असता ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती घटनेचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक वडणे यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास नारपोली पोलीस करीत आहेत.

हेही वाचा:

  1. Woman set On Fire In Jaipur विवाहितेला पेट्रोल टाकून पेटवून दिले, नागरिक मूकपणे बघत राहिले
  2. औरंगाबादेत विवाहितेला जिवंत जाळले; कारण काय तर, मुलगी झाली...
  3. पाच लाखांसाठी विवाहितेला जिवंत जाळले

ABOUT THE AUTHOR

...view details