महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनामुक्त होऊन ती बाळासह घरी रवाना, मातेच्या दृढ निश्चयापुढे कोरोनाही हरला - कोरोना बातमी

महानगरपालिकेच्या सेक्टर 10 वाशी येथील डेडिकेटेड कोव्हीड - 19 रुग्णालयामध्ये 6 एप्रिल रोजी घणसोली येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेची अत्यंत सुव्यवस्थितरित्या सिझेरियन प्रसूती करण्यात आली. या महिलेच्या ह्रदयविषयक गुंतागुंतीच्या स्थितीमध्ये अत्यंत सुरक्षित रितीने ही प्रसूती पार पाडणार्‍या महापालिका वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे संपूर्ण राज्यभरात आणि देशात कौतुक करण्यात आले होते.

कोरोनामुक्त होऊन ती बाळासह घरी रवाना
कोरोनामुक्त होऊन ती बाळासह घरी रवाना

By

Published : Apr 21, 2020, 7:27 AM IST

Updated : Apr 21, 2020, 10:50 AM IST

नवी मुंबई - घणसोली येथील कोरोना पॉझिटिव्ह असेल्या महिलेच्या प्रसूतीनंतर ती कोरोना निगेटिव्ह होऊन रुग्णालयातून बाळासह सुखरूप घरी रवाना झाली आहे. दरम्यान, तेथे उपस्थित सर्वांनी बाळ व मातेचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

कोरोनामुक्त होऊन ती बाळासह घरी रवाना

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर 10 वाशी येथील डेडिकेटेड कोव्हीड - 19 रुग्णालयामध्ये 6 एप्रिल रोजी घणसोली येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेची अत्यंत सुव्यवस्थितरित्या सिझेरियन प्रसूती करण्यात आली. या महिलेच्या ह्रदयविषयक गुंतागुंतीच्या स्थितीमध्ये अत्यंत सुरक्षित रितीने ही प्रसूती पार पाडणार्‍या महापालिका वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे संपूर्ण राज्यभरात आणि देशात कौतुक करण्यात आले होते.

सुदैवाची बाब म्हणजे या महिलेच्या बाळास कोरोनाची लागण झाली नसल्याचे दोनवेळा केलेल्या तपासणीत सिध्द झाले. तर, प्रसूती झालेल्या महिलेचीही दोनवेळा तपासणी करण्यात येऊन ती देखील निगेटिव्ह झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या महिलेस वाशी रुग्णालयातून बाळासह घरी पाठवताना टाळ्यांच्या गजरात सुरक्षितपणे रवाना करण्यात आले. यावेळी महिलेसह रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू तरळले. कोरोना विरोधातील लढाई मनाशी जिद्द बाळगली तर आपण निश्र्चित जिंकू शकतो. हे त्या महिलेने दाखवून दिले आहेच, शिवाय तिच्या चिमुकल्या बाळानेदेखील आपल्यातील वेगळेपणाचा प्रत्यय दिला आहे, जो अनेकांची प्रेरणादायक ठरत आहे.

Last Updated : Apr 21, 2020, 10:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details