महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Accident On Mumbai Nashik Highway : मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

रविवारी सायंकाळी मुंबई-नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात (accident on Mumbai Nashik highway) झाला. या अपघातात दोन महिलांचा मृत्यु झाला आहे. यात तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू (Woman killed 3 injured in accident) आहे.

By

Published : Jan 2, 2023, 8:24 AM IST

Updated : Jan 2, 2023, 12:20 PM IST

Accident On Mumbai Nashik Highway
मुंबई नाशिक महामार्गावर अपघात

मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik highway) रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून एक बालक आणि दोन जण जखमी झाले (accident on Mumbai Nashik highway) आहेत. शहापूरजवळ टेम्पो, ऑटोरिक्षा आणि दुचाकीची समोरासमोर धडक (Woman killed 3 injured in accident) झाली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून एका लहान मुलासह तीन जण जखमी झाले आहेत. शहापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, तिघांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

उपचार सुरु :मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर जवळील कुमार गार्डन हॉलजवळ मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या टोयोटो गाडी, रिक्षा व स्कुटी अश्या तीन वाहनांचा विचीञ अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत स्कुटी व रीक्षाचा चक्काचुर झाला असून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला. या भीषण अपघातात शहापूर तालुक्यातील अश्विनी गोळे ही कवडास येथे राहणारी स्कुटीस्वार तरुणी जागीच ठार झाली असुन उपचार दरम्यान शहापुरातील कळंभे येथील सहाना अन्सारी यांचाही मृत्यू झाला. तर रिक्षामधील तीन प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर शहापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरु (Woman died in accident) आहे.



तीन गाड्यांचा अपघात :मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर शहापूर जवळील कुमार गार्डन हाँलजवळ काल संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये शहापुरातील कळंभे येथील सहाना अन्सारी, अश्विनी भास्कर गोळे (वय 21) यांचा जागीच मृत्यू झाला असून लहान मुलासह दोनजण जखमी झाले. गेल्या काही दिवसांपासून आसनगाव रेल्वे ब्रीजचे काम सुरू असल्यामुळे ठकेदाराच्या हलगर्जीपणामुळे सततची वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे काही वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने काढत असल्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या टोयोटो कार, रिक्षा व स्कुटी अश्या तीन गाड्यांचा विचीञ अपघात झाला असुन स्कुटी व रीक्षाचा चक्काचुर झाला (accident on highway) आहे.

कार आणि ट्रकचा भीषण अपघात : राजस्थानमध्ये 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी धक्कादायक बातमी समोर आली. हनुमानगड परिसरातील पल्लू पोलीस स्टेशन हद्दीतील मेगा हायवेवरील बिस्रासर गावागजवळ एक भीषण अपघात झाला. कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या या भीषण टक्करमध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला पल्लू रुग्णालयातून बिकानेरला रेफर करण्यात आले आहे. या अपघातात मृतांची ओळख पटू शकली (Woman died in accident) नाही.

Last Updated : Jan 2, 2023, 12:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details