महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime News : अनैतिक संबंधातून विधवा महिलेवर कोयत्याने हल्ला; प्रियकराला बेड्या - महिलेवर कोयत्याने हल्ला आरोपीस अटक

अनैतिक संबंधातून उल्हासनगर येथे महिलेवर कोयत्याने हल्ला करण्यात आला ( Woman Attacked Scythe In Immoral Relationship ) होता. त्यात महिला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी 24 तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या ( Accused Arrested Hill Line Police Station ) आहेत.

Thane Crime News
Thane Crime News

By

Published : Mar 2, 2022, 7:49 PM IST

ठाणे - एका ४० वर्षीय विधवा महिलेवर अनैतिक संबंध आणि पैशांच्या वादातून प्रियकराने भर रस्त्यात जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी उल्हासनगरात घडली ( Woman Attacked Scythe In Immoral Relationship ) होती. याप्रकरणी हिललाईन ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हल्लेखोर प्रियकराला बेड्या ठोकल्या ( Accused Arrested Hill Line Police Station ) आहेत. रघुनाथ भोईर ( वय ५५ ) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प नंबर ५ च्या येथे पीडित विधवा रमा कांबळे यांचा फुले विक्रिची व्यवसाय आहे. त्यांच्या पतीचे काही वर्षापुर्वी निधन झाले आहे. त्यानंतर हल्लेखोर रघुनाथ हा पीडित महिलेला व्यवसायात मदत करायचा. तेव्हाच त्यांचे सूत जुळत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र, पीडित विधवा महिलेची मुले मोठी झाल्याने रघुनाथ सोबत संबंध ठेवण्यास नकार देत होत्या. तर, दुसरीकडे आरोपी रघुनाथ संबंध ठेवण्यासाठी पीडितेला त्रास देत होता. यावरुन दोघांत वादही झाले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

त्यानंतर मात्र, आरोपीने ब्लॅकमेल करुन अनैतिक संबंध तोडण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली. तसेच, 5 लाख दिले तरच तुला सोडेल असे बोलत होता. पण, विधवा महिला पैश्याच्या मागणीला नकार देत होती. त्याच वादातून रघुनाथ भोईरने रमा हिचा काटा काढण्यासाठी सोमवारी सकाळच्या सुमारास भररस्तात कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर रमा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

24 तासांत अटक

जखमी अवस्थेत रमाला उपचारासाठी उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, प्रकृती गंभीर झाल्याने मुंबईच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर हिललाईन पोलिसांनी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रघुनाथ भोईर याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार 24 तासांत आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आर. डी. खेरडे करत आहे.

हेही वाचा -Nitesh Rane On Disha Salian : पोलिसांच्या नोटिसीनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले, 'दिशाला न्याय मिळावा...'

ABOUT THE AUTHOR

...view details