महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपच्या मदतीने कल्याण पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे बंडखोर विजयी - Kiran Thombre win Kalyan Panchayat Samiti

कल्याण पंचायत समितीच्या उपसभापती पदी भाजपच्या मदतीने शिवसेनेचे बंडखोर किरण ठोंबरे हे विजयी झाले असून त्यांनी सेनेचेच अधिकृत उमेदवार भरत भोईर यांचा केवळ एका मताने पराभव केला.

किरण ठोंबरे उपसभापती पद विजय कल्याण  Election Kalyan Panchayat Samiti Deputy Chairman
किरण ठोंबरे विजय कल्याण पंचायत समिती

By

Published : May 13, 2021, 9:29 PM IST

ठाणे - कल्याण पंचायत समितीच्या उपसभापती पदी भाजपच्या मदतीने शिवसेनेचे बंडखोर किरण ठोंबरे हे विजयी झाले असून त्यांनी सेनेचेच अधिकृत उमेदवार भरत भोईर यांचा केवळ एका मताने पराभव केला. यावेळी राष्ट्रवादी काग्रेस पक्षाच्या सदस्या दर्शना जाधव या गैरहजर राहिल्याने हा विजय मिळवता आला, मात्र आपण सेनेचेच उपसभापती असल्याचा दावा यावेळी ठोंबरे यांनी केला. तहसीलदार दीपक आकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

विजय मिळाल्यानंतर ठोंबरे यांना अभिनंदन करण्यात आले

हेही वाचा -शेजारधर्माला काळीमा, अल्पवयीन मुलीवर वृध्दाचा लैंगिक अत्याचार

भाजपाचे सार्वधिक सदस्य असूनही सत्तेपासून दूर

कल्याण पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आहे. परंतु, यामध्ये कायम किंगमेकर ठरली ती भाजपा. कल्याण पंचायत समितीमध्ये भाजपच्या रंजना देशमुख, अस्मिता जाधव, पांडुरंग म्हात्रे, यशवंत दळवी आणि रेश्मा भोईर असे ५ सदस्य शिवसेनेचे अनिता वाकचौरे, रमेश बांगर, किरण ठोंबरे, भरत भोईर असे ४ सदस्य, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भरत गोधळे, दर्शना जाधव व भारती टेंभे या ३ सदस्यांचा समावेश आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असतानाही त्याला सत्तेपासून दूर ठेवण्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश आले होते, परंतु मागील निवडणुकीत शिवसेनेत बेबनाव झाला होता. शिवसेनेच्या अनिता वाकचौरे या सभापती, तर सेनेचेच रमेश बांगर हे उपसभापती म्हणून निवडूण आले होते. त्यावेळीही राजकीय वाद झाला होता.

निवडणूक ठरली अटीतटीची

मागील दोन ते तीन आठवड्यांपूर्वी उपसभापती रमेश बांगर यांच्या विरोधात शिवसेनेचे किरण ठोंबरे यांनी अविश्वास ठराव आणला होता व तो मंजूर देखील झाला होता. या पत्रावर एकूण १२ सदस्यांपैकी १० सदस्यांच्या सह्या होत्या. त्यामुळे, उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत असतानाच आज अचानक निवडणुकीच्या वेळी खोणी गटातील शिवसेनेचे सदस्य भरत भोईर यांनी उपसभापती पदाचे प्रबळ दावेदार उमेदवार किरण ठोंबरे यांच्या विरोधात उपसभापती पदासाठी उमेवारी अर्ज भरला आणि बिनविरोधचे चित्र पालटले.

राष्ट्रवादीच्या सदस्या गैरहजर

शिवसेनेच्या व राष्ट्रवादीच्या गटाने भरत भोईर यांना गळाला लावले होते. पण, आमदार किसन कथोरे यांनी अशी काही खेळी खेळली की नेमक्या आजच्या दिवशी राष्ट्रवादीच्या सदस्या दर्शना जाधव या गैरहजर राहिल्या. आज झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे किरण ठोंबरे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे, ठोंबरे यांना ६, तर सेनेचेच भरत भोईर यांना ५ मते मिळाली. त्यामुळे, ठोंबरे यांचा एका मतांनी विजय झाला. नवनिर्वाचित उपसभापती ठोंबरे यांनी सर्वांचे आभार मानत आपण शिवसेनेचाच उपसभापती असल्याचा दावा केला आहे. तसेच, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार किसन कथोरे यांच्या आशीर्वादामुळेच आपण उपसभापती झाल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -लॉकडाऊनमध्येही हजारो नागरिक रस्त्यावर, प्रशासनाचे दुर्लक्ष

ABOUT THE AUTHOR

...view details