ठाणे- अल्पावधीत प्रसिद्धी मिळवलेला 'येवले अमृततुल्य' चहा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. या चहाच्या अंबरनाथ पश्चिमेला असलेल्या दुकानात एका ग्राहकाला चहात तार आढळल्याने या दुकानात मोठा गोंधळ उडाला होता.
विकास सोमेश्वर हे आपल्या सहकाऱ्यांसोबत सोमवारी दुपारी येवले चहाच्या दुकानात चहा पिण्यासाठी आले होते. मात्र, त्याच्या चहात त्यांना तार आढळली. चहाचे कप धुण्यासाठी वापरण्यात येणारी घासणीची तार चहाच्या कपाला तशीच होती. या संबंधी दुकानदाराकडे तक्रार केली. मात्र, त्याने उद्धटपणे विकास यांना उत्तरे दिली. त्यामुळे संतापलेल्या ग्राहकाने दुकान बंद करायला लावले.