महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनासोबतच पावसाळ्यात पूरस्थितीला द्यावा लागेल लढा; खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांची माहिती - monsoon news

यंदा ४ ते ९ जून, २३ व २४ जून, ४ ते ७ जुलै आणि २१ ते २४ जुलै असे प्रत्येकी ८ तर, ऑगस्ट १९ ते २२ ऑगस्ट हे चार दिवस असे पावसाळ्यात एकूण २० दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. या दिवशी भरतीच्या पाण्याची उंची ४.५ मीटरपेक्षा अधिक असणार आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या भागातील नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले आहे.

astronomer d.k soman mumbai
प्रतिकात्मक

By

Published : May 11, 2020, 7:43 PM IST

ठाणे- कोरोनासोबतच यंदा पावसाळ्यात पूरस्थितीशी लढा द्यावा लागणार आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तब्बल २० दिवस समुद्राला उधाण येणार असल्याची माहिती पंचागकर्ता व खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली आहे. महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या पावसात उधाणाच्या कालावधीत अतिवृष्टी झाल्यास मुंबई, ठाणे परिसर जलमय होऊन मोठया नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

माहिती देताना खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण

मागील दिड महिन्यापासून कोरोनाशी युद्ध सुरू आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी शहरातील उपलब्ध मनुष्यबळ जीव ओतून काम करत आहे. मात्र, कोरोनाबरोबरच जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात शहराला पूर परिस्थितीलाही सामोरे जावे लागणार आहे. पावसाळ्यात समुद्राच्या भरतीच्यावेळी जर जोराचा पाऊस झाला तर मुंबई, ठाणेसारख्या शहरांमध्ये पाणी तुंबण्याची जास्त शक्यता असते. याबाबत खगोल आभ्यासक दा.कृ सोमण यांनी सुद्राच्या भरतीबाबत व हवामानाबाबत वेध घेतला आहे.

यंदा ४ ते ९ जून, २३ व २४ जून, ४ ते ७ जुलै आणि २१ ते २४ जुलै असे प्रत्येकी ८ तर, ऑगस्ट १९ ते २२ ऑगस्ट हे चार दिवस असे पावसाळ्यात एकूण २० दिवस समुद्राला उधाण भरती येणार आहे. या दिवशी भरतीच्या पाण्याची उंची ४.५ मीटरपेक्षा अधिक असणार आहे. यावेळी किनारपट्टीच्या भागातील नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे, यंदा कोरोनासोबतच २६ जुलै २००५ सारख्या पुरस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

उधाणाचे दिवस, वेळ व पाण्याची उंची

१) गुरुवार ४ जून सकाळी १०:५७, पाण्याची उंची ४.५६ मीटर २) शुक्रवार ५ जून सकाळी ११:४५, पाण्याची उंची ४.७५ मीटर ३) शनिवार ६ जून दुपारी १२:३३, पाण्याची उंची ४.८२ मीटर ४) रविवार ७ जून दुपारी १:१९, पाण्याची उंची ४.७८ मीटर ५) सोमवार ८ जून दुपारी २:०४, पाण्याची उंची ४.६७ मीटर ६) मंगळवार ९ जून दुपारी २:४८, पाण्याची उंची ४.५० मीटर ७) मंगळवार २३ जून दुपारी १:४३, पाण्याची उंची ४.५२ मीटर ८) बुधवार २४ जून दुपारी २:२५, पाण्याची उंची ४.५१ मीटर ९) शनिवार ४ जुलै सकाळी ११:३८, पाण्याची उंची ४. ५७ मीटर १०) रविवार ५ जुलै दुपारी १२:२३, पाण्याची उंची ४.६३ मीटर ११) सोमवार ६ जुलै दुपारी १:०६, पाण्याची उंची ४.६२ मीटर १२) मंगळवार ७ जुलै दुपारी १:४६, पाण्याची उंची ४.५४ मीटर १३) मंगळवार २१ जुलै दुपारी १२:४३, पाण्याची उंची ४.५४ मीटर १४) बुधवार २२ जुलै दुपारी १:२२, पाण्याची उंची ४.६३ मीटर १५) गुरुवार २३ जुलै दुपारी २:०३, पाण्याची उंची ४.६६ मीटर १६) शुक्रवार २४ जुलै दुपारी २:४५, पाण्याची उंची ४.६१ मीटर १७) बुधवार १९ ऑगस्ट दुपारी १२:१७, पाण्याची उंची ४.६१ मीटर १८) गुरुवार २० ऑगस्ट दुपारी १२:५५, पाण्याची उंची ४.७३ मीटर १९) शुक्रवार २१ ऑगस्ट दुपारी १:३३, पाण्याची उंची ४.७५ मीटर २०) शनिवार २२ ऑगस्ट दुपारी २:१४ पाण्याची उंची ४.६७ मीटर.

हेही वाचा-माणुसकीचे दर्शन..! उपाशी पोटी गावाकडे निघालेल्या मजुरांना दिले जेवण

ABOUT THE AUTHOR

...view details