महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime : बायकोनेच काढला नवऱ्याचा काटा, गळा आवळून केला खून

ठाणे जिल्ह्यात एका पत्नीने आपल्या पतीचा गळा आवळून खून केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालातून ही बाब समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. (wife strangled husband to death) (Thane Crime news).

murder
खून

By

Published : Aug 6, 2023, 6:33 PM IST

ठाणे : ठाणे जिल्ह्यात एका 38 वर्षीय पत्नीने तिच्या 49 वर्षीय पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाले. याप्रकरणी कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून या महिलेला अटक करण्यात आली आहे. प्रणिता मोरे असे महिलेचे नाव असून, तिने तिचा पती प्रवीण मोरे याची गळा आवळून हत्या केली.

आरोपी महिला मृतकची दुसरी पत्नी आहे : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक प्रवीण हा आरोपी पत्नीसोबत बल्याणी गावातील नाथकृपा चाळीत राहत होता. प्रणिता ही त्याची दुसरी पत्नी असून त्याची पहिली पत्नी डोंबिवली पूर्वेतील आयरेगावात 22 वर्षीय मुलासोबत राहते. हे दोघे 15 वर्षांपूर्वी विभक्त झाले होते. त्यानंतर प्रणिता आणि प्रवीणचे लग्न झाले. तेव्हापासून हे दोघे सोबत राहत होते.

मृतक पतीला दारूचे व्यसन होते : मृतक प्रवीणला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारूच्या नशेत त्याच्या पत्नीला मारहाण आणि शिवीगाळ करत असे. 3 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास प्रवीण दारू पिवून घरी आला. घरी येऊन त्याने प्रणिताला शिवीगाळ चालू केली. यानंतर या दोघांमध्ये भांडण सुरू झाले, ज्याचे रुपांतर हाणामारीत झाले. हाणामारी दरम्यान प्रणिताने प्रवीणचा गळा आवळला, ज्यामुळे तो जागीच बेशुद्ध पडला.

उपचारापूर्वीच मृत्यू : प्रवीण बेशुद्ध पडल्यानंतर प्रणिताने त्याला शेजाऱ्यांच्या मदतीने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुख्मिबाई रुग्णालयात दाखल केले. मात्र येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर याचा तपास कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात वर्ग केला गेला.

गळा आवळून खून केला : यानंतर पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर त्यांच्या मार्गदर्शानाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांनी या प्रकरणचा तपास सुरू केला. 4 ऑगस्ट रोजी मृत प्रवीणचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्याचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, पोलिसांनी प्रणिताला त्याब्यात घेऊन तिची अधिक चौकशी केली असता, तिने खुनाची कबुली दिली.

आरोपी पत्नीला अटक : या प्रकरणी मृतकच्या पहिल्या बायकोचा मुलगा प्रणाल मोरे (वय 22) याच्या तक्रारीवरून प्रणितावर भादंवि कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक केली गेली. प्रणिताला रविवारी विशेष न्यायालयात हजर केले. तेथे तिला पोलीस कोठडी सुनावली गेली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे करत आहेत.

हेही वाचा :

  1. Husband Murder Case: पती-पत्नीमध्ये झाला वाद; तीन मेहुण्यांनी मिळून केली पतीची हत्या, मृतदेह नदीत फेकला
  2. Model Rape Case Mumbai : महिला मॉडेलसोबत 'एनआरआय' मॉडेलचा लव-सेक्स-धोका; अत्याचाराचा अतिरेक अन् पोलिसात तक्रार
  3. Mumbai Crime News : 'त्या' लेडीज गॅंगमध्ये सासू, सून अन् मुलगीच ड्रग्ज सप्लायर! पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ABOUT THE AUTHOR

...view details