ठाणे- इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये नौदलातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याचा १०० टक्के जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना ५ जानेवारी रोजी समोर आली होती. ही घटना बदलापूरातील हायप्रोफाईल समजल्या जाण्याऱ्या साई आर्केड इमारतीत घडली होती.
गुड्डूसिंग यादव (वय 52 वर्षे) असे मृत माजी नौदल अधिकाऱ्याचे नाव आहे. तर सुनीता यादव (वय 38 वर्षे), असे आरोपी पत्नीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत पतीचे एका तरुणीशी प्रेम सबंध जुळून आल्याने ते दोघे लग्न करणार होते. याचा संशयातून आरोपी पत्नीने 5 जानेवारीला रात्रीच्या सुमारास झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर पती गाढ झोपल्याचे पाहून पत्नीने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून ठार मारल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर पश्चिम भागातील खामकर विद्यालयाजवळ असलेल्या साई आर्केड या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मृत गुड्डू सिंग यादव यांनी 2009 मध्ये हा फ्लॅट विकत घेतला होता. मृत यादव हे नौदलातून निवृत्त झाले होऊन ते दिल्ली येथे आयकर विभागात कार्यरत होते. या दरम्यान त्यांचे एका तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यातून ते दोघे लग्न करणार होते. या दोघांच्या लग्नाची माहिती आरोपी पत्नीला मिळाली होती. त्यामुळे आरोपी पत्नी सुनीता ही पतीला सोडून त्यांच्या दोन मुलासंह अलाहाबाद येथे राहत होती. त्यातच मृत यादव बदलापूरमधील फ्लॅट विकण्यासाठी 2 जानेवारीला ते आपल्या पत्नीसह बदलापूरला आले होते. 5 जानेवारीला मृत पतीचा वाढदिवसही होता. तर आरोपी पत्नीने आदीपासूनच घरात पेट्रोल आणून ठेवले होते. त्याच दिवशी आरोपी पत्नीने मृत गुड्डूसिंग यांना झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यांनतर पती गाढ झोपेत असल्याचे पाहून त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले.
हेही वाचा - तिहेरी हत्याप्रकरणी आरोपी त्रिकुटाला जन्मठेपेची शिक्षा
मात्र, त्यावेळी मृत पतीला शरीर भाजल्याने जाग येताच त्यांनी आरोपी पत्नीच्या दोन्ही पायाला पकडून ठेवले. त्यामुळे तीचेही पाय 20 ते 25 टक्के भाजले होते. तरी देखील ती पतीच्या तावडीतून सुटून तिने बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद करून घराबाहेर पळ काढला. तर यांच्या घरातून धूर येवू लागल्याने शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी या घटनेची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस व अग्निशामन विभागाला दिली होती.