ठाणे -पत्नीच्या अनैतिक संबधांत अडथळा ठरलेल्या पतीचा प्रियकर व त्याच्या मित्राच्या साथीने पत्नीनेच खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी पत्नी व तिच्या प्रियकराने पतीचा मृतदेह रिक्षात टाकून पुलाच्या खाली फेकून दिला. तर दुसरीकडे बेपत्ता झाल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात मृतकच्या भावाने देऊन माझ्या भावाचे बरेवाईट झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला. याच संशयाच्या आधारावर कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने पत्नीची चौकशी करून तिच्या मोबाइलमध्ये असलेल्या नंबरचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. लक्ष्मी उर्फ राणी प्रविण पाटील (वय- २२) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. तर अरविंद उर्फ मारी रविंद्र राम (वय-२०) असे तिच्या प्रियकराचे नाव असून त्याचा मित्र सनीकुमार रामानंद सागर (वय- १९) याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाल्याने तिघांनाही कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. तर प्रविण धनराज पाटील (वय -३०) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे.
मृतक प्रवीण हा पत्नीसह डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा गावात राहून एका खाजगी कंपनीत कामाला होता. तर पत्नी रिक्षाचालक असून काही महिन्यापूर्वी तीचे आरोपी रिक्षाचालक अरविंद उर्फ मारी याच्याशी प्रेमसंबंध निर्माण होऊन सूत जुळले. त्यांनतर दोघांमध्ये अनैतिक सबंध निर्माण झाले. याची कुणकुण मृत पतीला लागल्याने त्याने आरोपी पत्नीला संबध तोडण्यास सांगितले. मात्र तिचे व आरोपी अरविंद उर्फ मारीमध्ये अनैतिक सबंध सुरुच होते. त्यातच लक्ष्मी हिचे अनैतिक प्रेमसबंध असून पती प्रवीण आपल्या पत्नीवर संशय घेऊन त्रास देत असल्याने पत्नी आणि प्रियकर व त्याच्या मित्राला २ जून २०२१ रोजी मध्यरात्री रोजी घरी बोलावून त्याला मारहाण करुन बेशुध्द केले. त्यानंतर गळ्यावर वार करून त्याचा घरातच खून केला.
रिक्षातुन ६० किलोमीटर अतंरावर टाकला मृतदेह