ठाणे: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकर व त्याच्या मित्राच्या मदतीने पत्नीने राहत्या डोंबिवलीतील चाळेगावाच्या घरातच पती हत्या केली. तसेच ओळख पटू नये म्हणून मृतदेहाला दगडाने ठेचून मृतदेह कसारा घाटात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कसारा पोलिसांनी शिताफीने तपास करून पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली. तर साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. आरोपीना अटक केली आहे.
एक वर्षापूर्वी निर्माण झाले प्रेम संबध:पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपासून जुन्नर तालुक्यातील मृत पती हे आरोपी पत्नी हिच्या सोबत सुखाने संसार करीत होते. विशेष म्हणजे दोघांचा प्रेम विवाह झाला होता. त्यांना दोन लहान मुलेही आहेत. त्यातच मृत पती आणि आरोपी पत्नी हे दोन मुलांसह डोंबिवलीतील चोळेगाव येथे राहणाऱ्या नातेवाईकाच्या ओळखीने याच परिसरात घर घेऊन राहायला होते. त्यानंतर हे मृत पती व आरोपी पत्नी दोघेही कायम कल्याणकडे नातेवाईकांकडे येत जात होते. या दरम्यान एक वर्षापूर्वीपासून कल्याण डोंबिवली परिसरात टेम्पो मधून भाजीपाला पुरवठा करणाऱ्या आरोपीशी पत्नीचे प्रेम संबध निर्माण झाले.
पत्नी मुलासह गेली प्रियकऱ्याच्या घरी: या प्रकरणाचा संशय मृत पतीला आल्याने पती पत्नीत वाद होऊ लागले. परंतु दोन लहान मूल असल्याने ते वाद क्षणिक असायचे. याच दरम्यान एप्रिल महिन्यात आरोपीने पत्नीशी संपर्क करून तिला फुस लावून कल्याणला बोलवले. तिने घरात मी माझ्या नातेवाईकांकडे कल्याणला जाऊन येते असे सांगून ती मुलांना घेऊन कल्याणला गेली. तिथे ती रूम घेऊन राहू लागली बरेच दिवस झाले पत्नी व मूल आले नाहीत म्हणून, पती यांनी कल्याणला नातेवाईकांकडे तपास केला व माहिती घेतली असता आरोपी पत्नी रूम घेऊन चोळेगाव परिसरात रहात असल्याची माहिती मिळाली.
लोखंडी रॉडने हल्ला:मृत पती सुशील पत्नीच्या खोलीवर गेला त्यावेळी तीने त्याची समजूत काढली. पण काही दिवस मूत पती त्याच घरात मुक्काम करत होता. त्यामुळे प्रियकर व आरोपी पत्नीच्या अनैतिक संबंधास आडथळा ठरत होता. याच वादातून त्यांच्यात 13 एप्रिल २०२३ रोजी पुन्हा पती पत्नीत वाद होऊन हाणामारी झाली. त्यावेळी पती व पत्नीत वाद सुरु असतानाच प्रियकर देखील तिथे आला. मुलांना इतरत्र् पाठवल्याने घरात दुसरे कोण नव्हते याचा फायदा घेत, आरोपी व पत्नीने पती सोबत पुन्हा वाद घातले व लोखंडी रॉडने हल्ला केला.
दगडाने सुशीलला ठेचले:या हल्ल्यात पती मृत अवस्थेत आरोपी पतीला भाजीपाला आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिक अप टेम्पोत ड्रायवरच्या बाजूला बसवले व सोबत एका साथीदाराला घेतले. दरम्यान, टेम्पो मुबई नाशिक महामार्गांवरून कसारा दिशेकडे रवाना झाला. मृत आरोपी व त्याचा साथींदार असे तिघेही पहाटेच्या सुमारास जुना कसारा घाट क्रॉस करून नवीन घाटात आले. तिथे गणपती मंदिराच्या लगत टेम्पो उभा करून मागील खोल दरीत मृतदेह फेकला. मात्र पती मृत नसल्याचा संशय आल्याने आरोपी व त्याच्या साथीदाराने मोठमोठी दगडाने ठेचले त्याच्या चेहऱ्यावर, पायावर गभीर घाव घालून चिन्न विचिन्न केले. तसेच मृतदेह खोल दरीत फेकून दिला.
गुराखीनी दिली माहिती: कासरा घाटाच्या दरीत मृतदेह टाकला होता त्या ठिकाणी काही अंतरावर पाण्याचा नाला आहे. त्या ठिकाणी गायी, म्हशी घेऊन अनेक शेतकरी चारा पण्यासाठी जात असतात. याच दरम्यान १६ एप्रिल रोजी एका गुरख्यास हा मृतदेह आढळून आल्यानंतर, त्याने आपत्ती व्यवस्थापन टीम व कसारा पोलिसांना माहिती दिली. कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह खोल दरीतून काढत पंचनामा करून, उत्तरणीय तपासणीसाठी शहापूरच्या उपजिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना केला.
मृतकाच्या आई मुळे लागला छडा: मृत सुशील यांच्या सहा वर्षीय मुलीने गावी आपल्या आजीला मोबाईलवर कॉल करून आजी पप्पा कल्याणच्या घरी नाही तिकडे आले का आम्हाला त्यांची खूप आठवण येत आहे. असे म्हणत पप्पांची विचारपूस केली. त्यानंतर मृतकच्या आई वडिलांना १३ एप्रिल पासून मुलगा आला नसल्याने त्यांनी नातीचा फोन आल्या नंतर थेट कल्याण गाठले. तिथे जवळील पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना मुलगा बेपत्ता असल्याची माहिती दिली. पोलिसांनी कसारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या मृतदेहाची माहिती दिली. त्या माहित नुसार मृतकच्या आई वडिलांनी व मित्रानी थेट कसारा पोलीस ठाणे गाठले व मिळालेल्या साहित्यावरून कपड्यावरून व फोटो वरून मृतदेह आमच्याच मुलाचा असल्याचे सांगितले.
दोन्ही अटक आरोपी पोलीस कोठडीत: विभागीय पोलीस उपाधीक्षक विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप गिते, पी.एस आय सलमान खतीब, पोलीस कर्मचारी कुणाल बावधने, अशोक दाडेकर, महिला पोलीस कर्मचारी यांनी पुढील तपास करीत मृतकच्या पत्नीला संशयित आरोपी म्हणून व तिचा प्रियकर या दोघांना सोमवारी १ मे रोजी तब्यात घेतले. तर त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी हत्येची कबुली दिली. या गुन्ह्यातील एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. दोन्ही अटक आरोपीना बुधवारी न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप गिते करीत आहेत.
हेही वाचा:Thane Crime हॉटेल मालकांना चाकू धाक दाखवून लूटमार एका गुन्हेगाराला पिस्तूलसह अटक