महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Wife Murder Case : फार्म हाऊसमध्ये दारू पिण्यास विरोध; बायकोच्या डोक्यात कुऱहाड मारून केले ठार

नवऱ्याला दारू पिण्यास विरोध (husband opposing drinking in farm house) करणाऱ्या बायकोच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याची (Wife axed to death by husband) धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात नवऱ्यावर हत्येचा गुन्हा दाखल (murder case registered against husband) करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या (husband killed his wife arrested) आहेत. latest news from Thane, Thane Crime

By

Published : Nov 26, 2022, 9:07 PM IST

Wife Murder Case
बायकोचा मारेकरी अटकेत

ठाणे : नवऱ्याला दारू पिण्यास विरोध (husband opposing drinking in farm house) करणाऱ्या बायकोच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याची (Wife axed to death by husband) धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण तालुक्यातील आपटी गावातील एका फार्म हाऊसमध्ये घडली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात नवऱ्यावर हत्येचा गुन्हा दाखल (murder case registered against husband) करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या (husband killed his wife arrested) आहेत. युवक बाळु दुटे ( वय ३८ ) असे अटक केलेल्या नवऱ्याचे नाव आहे. तर उषा युवक दुटे (वय ३१) असे निर्घृण हत्या झालेल्या बायोकोचे नाव आहे. latest news from Thane, Thane Crime

नवरा बायकोमध्ये सतत घरगुती वाद :आरोपी युवक दुटे हा मृत पत्नीसह कल्याण तालुक्यातील आपटी गावाच्या हद्दीतील बिंदुसरा फार्म हाऊसमध्ये कामगार म्हणून कामा होता. तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेलविरे गावचा रहिवाशी आहे. आरोपी नवऱ्याला दारूचे व्यसन असल्याने नवरा बायकोमध्ये सतत घरगुती वाद होत होते. याच कारणावरून पुन्हा २३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास नवरा बायकोमध्ये नवरा दारू पीत असताना त्याला मृत बायकोने विरोध केला. त्यामुळे वाद होऊन हा वाद विकोपाला जात आरोपी नवऱ्याने बायोकोच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालुन तिची निर्घृण हत्या केली.

आरोपी पतीविरुध्द हत्येचा गुन्हा दाखल :दरम्यान, मृतक बायोकोचा भाऊ दत्तु सिताराम परते (वय ३६) हा मुंबईतील मंडाळा टि.आय.एफ.आर.कॉलनी, मानखुर्द येते राहतो. गेल्या दोन दिवसापासून बहिणीशी संर्पक होत नसल्याने २४ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास बिंदुसरा फार्म हाऊसवर आला असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यानेच पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर मृतकचा भाऊ दत्तु परते यांच्या तक्रारीवरून २५ नोव्हेंबर रोजी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा आधारे आरोपी नवऱ्याला पोलिसांनी अटक करून आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता २८ नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनवाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती जगताप करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details