महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक ! ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या विधवेची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या - Bhiwandi police news

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात विधवा महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Widow brutally murdered with a sharp weapon
धक्कादायक ! ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या विधवेची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या

By

Published : Dec 19, 2020, 5:25 PM IST

ठाणे - ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या विधवा महिलेची तिच्या राहत्या घराच कोणी नसताना अज्ञात मारेकऱ्याने धारधार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील तीनबत्ती परिसरात असलेल्या हाफसनआळी परिसरातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घडली आहे. लक्ष्मीबाई भुरला ( वय ३८ ) असे हत्या झालेल्या विधवा महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

धक्कादायक ! ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या विधवेची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या

मुलगा रात्रीपाळी करून आल्यानंतर घटना आली उघडकीस -

मृत लक्ष्मीबाई भुरला यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय असून त्यांना दोन मुलं आहेत. त्यापैकी एक मुलगा त्याच्या सोबत राहत असून तो शुक्रवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी कामाला गेला होता. त्याच दरम्यान मृत महिला घरात एकटी असतांना कोणीतरी अज्ञात मारेकऱ्याने घरात घुसून लक्ष्मीबाई यांच्या शरीरावर धारधार शस्त्राने ९ ते १० वार करत गळा चिरून त्यांची हत्या केली. मृताचा मुलगा रात्रपाळीचे काम आटपून शनिवारी सकाळी घरी आला असता घरचा दरवाजा लॉक असल्याने त्याने उघडून बघितले. यावेळी घरात रक्ताच्या थारोळ्यात आईचा मृतदेह पाहून त्याला धाक बसला. ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, व फॉरेंसिक लॅबचे पथक दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला असून या घटनेचा सखोल तपास सुरु आहे.

ओळखीच्या मारेकऱ्याने हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज -

घराचा दरवाजा आतून उघडण्यात आला असल्याने व घरातील वस्तूंची चोरी झाली नसल्याने ही हत्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीने केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. आता भिवंडी शहर पोलीस सखोल तपास करत असून विधवेची निर्घृण हत्या नेमकी कुठल्या करणारून झाली, याचा तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details