ठाणे -कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी खबरदारी म्हणून गर्दीची ठिकाणे टाळावी. नागरिकांनी एक दोन रुपयांच्या नादात आपला जीव धोक्यात घालून नये. याकरता आता पालिका प्रशासन जांभळी नाका येथील घाऊक भाजी मार्केट बंद करण्याचा विचार करत असल्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
...तर घाऊक भाजी मार्केट होणार बंद, पालिका प्रशासनाचा गंभीर इशारा - corona effect
कोरोनाचा वाढता प्रसार पाहता सोशल डिस्टन्सिंग व्हावे यासाठी जांभळी नाका येथील घाऊक बाजार दोन दिवस सेंट्रल मैदान येथे हलविण्यात आले. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश आले नाही. त्यामुळे आता हा घाऊक बाजारच बंद करावा, याचा विचार पालिका प्रशासन करत आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार पाहता सोशल डिस्टन्सिंग व्हावे यासाठी कोपरी नौपाडा प्रभागाचे सहआयुक्त मारुती गायकवाड आणि ठाणेनगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी घाऊक व्यापाऱ्यांशी चर्चा करून अनेक उपाय करून पाहिले. हा घाऊक बाजार दोन दिवस सेंट्रल मैदान येथे देखील हलविण्यात आला. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश आले नाही. त्यामुळे आता हा घाऊक बाजारच बंद करावा, याचा विचार पालिका प्रशासन करत आहे.
नागरिकांनी दोन चार रुपये वाचविण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालू नये. आपापल्या प्रभागातील किरकोळ भाजी विक्रेत्यांकडूनच भाजी विकत घ्यावी, असे आवाहनही मारुती गायकवाड आणि रामराव सोमवंशी यांनी केले आहे.