ठाणे:ठाणे शहरात एकूण ४७० अंगणवाड्या आहेत. त्यात तेवढ्याच अंगणवाडी सेविका (Anganwadi workers) लहान मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देत आहेत. ९८% अंगणवाड्या या खासगी घरात, मंदिरात तसेच राजकीय कार्यालयात भरवल्या जात आहेत. मात्र, राज्य शासनाकडून घर मालकाला मिळणारे ७५० रु. भाडं शासनाकडून थकीत आहे. गेली दिड वर्ष हे भाडे मिळत नसल्याने घर मालकांकडून आता त्यांचा घरात अंगणवाड्या भरविण्यास मनाई केली जात आहे.
चिमुरड्या बालकांना शिकवायचे कुठे ? ठाण्यातील अंगणवाडी सेविकांसमोर यक्षप्रश्न बालकांना शिकवायचे कुठे ? त्यामुळे मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण आता रस्त्यावर बसवून द्यायचं का ? असा सवाल अंगणवाडी सेविका उपस्थित करत आहेत. तर शासनाकडून अंगणवाडीसाठी मिळणार ७५० रु. घर भाडं(rent got stuck) मिळत तर नाहीच मात्र ते दिल तरी आम्हाला आता ते न परवडणार असल्याने घराचं लाईट बिल, पाणी बिल आम्ही तरी भरायचं कस, असा प्रश्न घरमालक विचार आहेत.
राज्य सरकार (state Government) विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या योजना आणणार असल्याचं सांगत असतांना मुख्यमंत्र्याच्या स्मार्ट ठाण्यात ही अवस्था असल्याने राज्य सरकार आणि शासनाने हा प्रश्न गांभीर्याने सोडविण्याची गरज असल्याचं अंगणवाडी सेविका सांगतात. ठाण्यातील इंदिरा नगर,वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, संत ज्ञानेश्वर नगर, अंबिका नगर, सावरकर नगर आदी भागात अंगणवाड्या सेविका चिंतेत असून राज्य सरकार काय तोडगा काढते याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान या आणि इतर मागण्यासाठी शासन दरबारी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलं आहे.
आता पुढे काय असा यक्ष प्रश्नगेली १९ वर्ष अंगणवाडी सेविका म्हूणन कार्यरत आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून शासनाकडून पैसे जमा करण्यात आले नसल्याने घरमालक नेहमी विचारणा करत आहेत. लाईट, पाणी याचा वापर करण्यात येतो. त्यामुळे १५ दिवसांत पैसे दिले नाहीत तर घराबाहेर काढण्याचा इशारा देण्यात आलं आहे. आमचे ही मानधन वेळेत होत नाही. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.