ठाणे :मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी अनेक वर्ष न्यायालयीन लढाई म्हणा किंवा रस्त्यावर उतरून लढाई म्हणा आनंद दिघे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी परिस्थिती दोन दशकापूर्वी ठाण्यामध्ये होती. त्यामुळे आनंद दिघे यांच्या दिवंगत झाल्यानंतर प्रति दिघे बनण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. तर, दिघे यांचा आदर्श ठेवून राजकारणाची वाटचालही अनेकांनी केली, तर काहींनी मात्र केवळ आनंद दिघे यांच्या नावाने राजकारण करीत आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजण्याचा प्रकार केला असल्याचे चित्र ठाणे जिल्ह्यात तरी पाहायला मिळते आहे. आगामी लोकसभा विधानसभा आणि पालिका निवडणुकांमध्ये ही पुन्हा एकदा हा प्रत्यय येणार आहे. राजकीय विश्लेषकांनी हे मत व्यक्त केले आहे.
दिघेंनतर मराठी माणूस हाताश : ठाणे जिल्ह्यात मराठी माणसासाठी प्राणपणाने लढणारा, सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखात धावून जाणारा शिवसेनेचे ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख म्हणून आनंद दिघे यांची ओळख आहे. आपल्या कर्तृत्वाने आणि जन माणसाच्या सामाजिक कार्याने त्यांच्या नावाचा लौकिक ठाणे जिल्ह्याचा बांध फोडून मुंबईच्या मातोश्री आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. ठाणे म्हटले की शिवसेनेचे आनंद दिघे यांचे असे एक समीकरणच राजकारणात, समाजकारणात पाहायला मिळत होते. आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाणे जिल्ह्यातील मराठी माणूस हवालदिल झाला होता. दिवंगत दिघेंसारखं आपल्याला आता संरक्षण कोण देणार? आपली वाटचाल कशी होणार? आपल्यासाठी कोण लढणार? यामुळे मराठी माणूस हाताश झाला होता, असे मत जनतेतून आजही मांडण्यात येते.
जिल्हावासीयांना दिघेंचा पाठिंबा :अनेकांनी आपले राजकारण आणि त्यांचा प्रवास जय विजय मिळवला तो केवळ दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाने. त्यामुळे ठाण्यातील राजकारणाला दिवंगत आनंद दिघे यांचे सुरक्षा कवच निर्माण झाले. राजकारणाची गणित नेहमी बदलत असल्याने दिघे यांच्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचे महत्त्व कुठेही कमी पडले नाही. दिघेप्रेमी ठाणे जिल्हावासीयांनी त्यांच्यानंतर त्यांचे हॉटेल, टपऱ्या, चहाची दुकाने या ठिकाणी दिघे साहेबांचे अगदी ईश्वराप्रमाणे फोटो देखील लागले.
जिल्ह्यात शिवसेनेची पक्कड घट्ट :दिवंगत आनंद दिघे यांच्या पश्चात आजही ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात दिघे साहेबांच्या नावाचा वापर करून ठाण्यात अनेक पक्ष, नेते जे दिघे साहेबांच्या कार्यकाळात त्यांच्या आसपास किंवा निकटवर्ती होते. प्रत्येकाने दिवंगत दिघे यांच्यानंतर त्यांच्या नावाचा फायदा घेतला. त्यांना आदर्श बनून आपली वाटचाल आणि राजकारणाच्या दशा आणि दिशा ठरविल्या. दिघे साहेबांनंतर ठाणे जिल्ह्यात त्यातल्या त्यात ठाणे महापालिकेवर शिवसेनेने तब्बल पंचवीस वर्ष अखंडित सत्ता गाजवली केवळ दिघे साहेब हेच आदर्श आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात वाटचाल करीत असल्याचं सांगत आणि दिघे साहेबांचा आदर्श आणि त्यांचा राजकीय प्रवास मराठी माणसाच्या हितासाठी पुढे नेत असल्याचे दाखवून जिल्ह्यात शिवसेनेची पक्कड अगदी घट्ट झाली आणि महापालिकेत सत्ता मिळवून यावर तर शिक्का मोर्तब झाले.
महापुरूषांच्या नावाचा वापर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करून राजकारण करीत असल्याचे अनेक प्रश्न पाहायला मिळाले. आज तर राजकारणाची परिस्थितीच वेगळी आहे आदर्श पुरुषाचं महापुरुषांचे नाव घेऊन निवडणुकांना सामोरे जाणे मत परिवर्तन करणे अशा अनेक गोष्टी राजकारणी मंडळी साध्य करून घेताना दिसतात. वास्तविक पाहता ही राजकीय मंडळी यांना आदर्श म्हणतात त्यांची कुठली छबी त्यांच्या कार्यातून किंवा त्यांच्या वर्तणुकीतून जन माणसाला दिसत नाही, असेही मत राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे. मात्र आदर्श आणि महापुरुषांचा इतिहास त्यांचे कार्य त्यांची लोकप्रियता याचं भांडवल करीत राजकारणात मुसंडी मारणार यांची संख्याही अगणित आहे. त्यामुळे अशा महापुरुषांचं नाव आदर्श अंगीकारित देशभरात विविध पक्ष राजकीय नेते आपल्या राजकारणाची भरभराटी करताना दिसतात. नेमका तसाच प्रकार ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात पाहायला मिळतो. कारण जनसेवा आणि सर्वसामान्यांचे नेतृत्व हेच ध्येय दिवंगत आनंद दिघे यांचं होतं जरी ते शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख होते तरी देखील त्यांच्या आनंदाश्रमात अन्य पक्षाचे नेतेमंडळी आणि सर माणसं पाहायला मिळत होती, हेच आजचे वास्तव असल्याचे, राजकीय विश्लेशक सांगत आहेत.
हेही वाचा -Bawankules On Congress : काँग्रेसला मत देणे म्हणजे देशात अराजकता निर्माण करणे, बावनकुळे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल