ठाणे -एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला खाडी, मध्ये शेकडो घरं आणि हजारो इमारती, लॉकडाऊनमुळे रोज धावणाऱ्या शहराची आज थांबली गती, ही आजची परिस्थिती आहे ठाणे शहराची. तब्बल एक वर्षानंतर ठाणेकर पुन्हा लॉकडाऊन अनुभवत आहे. याचा आढावा घेतला आहे, 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी मनोज देवकर यांनी.
ठाण्यात विकेंड लॉकडाऊनला सुरुवात ठाण्यात रस्त्यांवर शुकशुकाट
ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दररोज 1700 ते 1800 नवे रुग्ण ठाणे शहरात आढळत आहेत. राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री 8 वाजेपासून राज्यात लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून ठाणे शहरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. नेहमी ट्राफिक जाम असणाऱ्या माजिवडा नाका येथे तुरळक वाहने दिसून येत आहेत. पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
हेही वाचा -मिनी लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद; मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट