ठाणे -आज (सोमवारी) सकाळपासून येथे वीजपुरवठा खंडित झाला होता. यानंतर दुपारपर्यंत काही भागात हा वीजपुरवठा सुरू झाला. मात्र, ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे काम वीजपुरवठा खंडित झाल्याने पूर्णतः ठप्प झाले होते. मात्र, दुपारी महावितरणकडून सेवा पूर्ववत केल्यानंतर ठाणे महानगरपालिकेचा पाणीपुरवठा सुरुळीत झाला.
या वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे ठाणे शहरात रात्री उशिरापर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. यासोबत ठाण्यातील काही भागात अजूनही वीज पुरवठा खंडीत आहे. लवकरच तोदेखील लवकरच सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन शासनातर्फे देण्यात आले आहे.
यादरम्यान, होण्यात कोणाकडूनही विद्युत उपकरण किंवा साहित्याच्या नुकसान झालेल्याची माहिती प्रशासनाला दिलेली नाही. त्यामुळे सर्व रुग्णालय आणि व्यावसायिक आस्थापना सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.