ठाणे- जिल्हाधिकारी कार्यालयातून चक्क जलशुद्धीकरण यंत्र (वॉटर प्युरिफायर मशीन) चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून जलशुद्धीकरण यंत्राची चोरी - RO
जिल्हाधिकारी कार्यालयातून चक्क जलशुद्धीकरण यंत्र (वॉटर प्युरिफायर मशीन) चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
ठाणे पश्चिमेकडील कोर्ट नाका परिसरात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेरील नं.214 समोरील व्हरांड्यात बसविण्यात आलेले पिण्याच्या पाण्यासाठीचे 4 हजार रुपये किमतीचे वॉटर प्युरिफायर यंत्र अज्ञात चोरट्यांनी पळविले. हा प्रकार 30 जुलै रोजी सायंकाळी 8 ते 31 जुलै सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान घडला आहे, अशी तक्रार ग्राहक तक्रार निवारण मंचचे प्रबंधक चंद्रकांत उगले यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात केली आहे.