महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कचऱ्याच्या डब्यात धुतात चहाचे कप; ठाणे रेल्वे स्थानकातील ओंगळवाणा प्रकार - कचऱ्याच्या डब्यात चहाचे कप धुण्याचा व्हिडिओ

रेल्वे स्थानकातील खाद्य पदार्थांचे स्टॉल म्हणजे आजारपणाचे माहेरघर होऊ लागलेत. काही महिन्यांपूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकाच्या खाद्यपदार्थ स्टॉलच्या छतावर एक व्यक्ती घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत बनवत असल्याचा गलिच्छ प्रकार एका जागरूक प्रवाशाने मोबाइलद्वारे चित्रित केला होता.

wash-tea-cups-in-the-trash-bin-video-goes-viral
कचऱ्याच्या डब्यात धुतात चहाचे कप

By

Published : Dec 20, 2019, 5:04 PM IST

ठाणे - येथील रेल्वे स्थानकातील स्टॉलवरील एक व्यक्ती चक्क सुक्या कचऱ्यासाठी ठेवलेल्या कचरापेटीत चहाचे कप धुताना दिसत आहे. एका जागरूक प्रवाशाने या प्रकाराचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. अशाप्रकारे धुतलेल्या कपामध्ये ग्राहकांना चहा देऊन त्यांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.

कचऱ्याच्या डब्यात धुतात चहाचे कप

हेही वाचा-आनंद महिंद्रा चेअरमन पदावरून होणार पायउतार

रेल्वे स्थानकातील खाद्य पदार्थांचे स्टॉल म्हणजे आजारपणाचे माहेरघर होऊ लागलेत. काही महिन्यांपूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकाच्या खाद्यपदार्थ स्टॉलच्या छतावर एक व्यक्ती घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत बनवत असल्याचा गलिच्छ प्रकार एका जागरूक प्रवाशाने मोबाइलद्वारे चित्रित केला होता. त्यांनतर काही तासांतच रेल्वे प्रशासांनी स्टॉलला टाळे ठोकले. परंतु, यामुळे काहीच फरक पडलेला दिसत नाही. कारण आता पुन्हा एकदा ठाणे रेल्वे स्थानकावरील एक ओंगळवाणा प्रकार समोर आला आहे. सदर व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल झाला आहे. त्यामुळे आतातरी रेल्वे प्रशासन जागे होऊन असले ओंगळवाणे प्रकार करणाऱ्यांवर लगाम घालेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details