ठाणे - भिवंडी तालुक्यातील मानकोली नाका परिसरातील हरिहर कंपाऊंडमध्ये असलेल्या कुरियर गोदामाच्या इमारत कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. भिवंडी गोदाम दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत. जखमींवर भिंवडीमधील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सौरभ त्रिपाठी या कामगाराचा मृत्यू झाला आहे. सेक्युरिटी गार्ड म्हणून होता गोदामात कामाला होता. तर सुनील कुमार, कल्पना पाटील, रोशन पागी, अक्षय केनी आणि शैलेश तरे ही पाच जणांना बाहेर काढले असून ते गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी एनडीआरएफची पथके दाखल झाली असून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.
एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल -