ठाणे - कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील नाथा नामक वॉर्डबॉय दारू पिऊन तर्राट होऊन रूग्णालयाच्या आवारातच पडल्याची घटना काल (बुधवार) पाहायला मिळाली. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय नेहमी विविध कारणांमुळे गाजत असते.
हेही वाचा - 'फेसबुक'वरील मैत्री पडली महागात; मैत्रिणीने घातला मित्राला गंडा
या रूग्णालयात रोज हजारो रूग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या रूग्णालयात नेहमी गर्दी असते. काल (बुधवार) संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एक वॉर्डबॉय महत्वाच्या कागदपत्रांसह दारूच्या नशेत रूग्णालयाच्या आवारातच पडल्याची घटना घडली. हा वॉर्डबॉय ऑर्थोपेडिक विभागात काम करतो. डॉक्टरांनी त्याच्याकडे महत्वाच्या कागदपत्रांची फाईल दिली होती. मात्र, त्याने ही फाईल संबंधित विभागात न पोहोचवता दारूच्या नशेत रूग्णालयाच्या आवारातील हिरवळीवरच झोपी गेला.