महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात संरक्षक भिंत कोसळून दोन वाहनांचे नुकसान; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - CCTV video

व्हिडिओमध्ये ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वसंत लीला कॉम्प्लेक्समधील संरक्षक भिंत २ वाहनावर पडली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही किंवा जीवितहानी झाली नाही. परंतु, वाहनात कोणी असले असते तर, मोठा अनर्थ घडला असता.

संरक्षक भिंत कोसळली

By

Published : Aug 3, 2019, 1:23 PM IST

ठाणे -जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे घोडबंदर परिसरात संरक्षक भिंत कोसळल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, भित कोसळून २ वाहनांचे नुकसान झाले आहे. घोडबंदर रोडवरील वसंतलीला कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली आहे. भिंत कोसळल्याची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

वसंत लीला कॉम्प्लेक्समधील कोसळली

पावसामुळे पाणी साठून ही भिंत कोसळल्याचे या व्हिडिओतील दृश्यामध्ये दिसत आहे. भित कोसळल्यानंतर साठलेल्या पाण्याचा प्रवाह इमारतीच्या परिसरात वाहत असल्याचे यामध्ये दिसत आहे. दरम्यान यावेळी वाहनात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details