महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मतदान करण्यासाठी एक 'असेही' आवाहन

देशात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी हनुमान जयंतीनिमित्त एका हनुमान भक्ताने मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे.

मतदान करण्याचे आवाहन करताना हनुमान भक्त

By

Published : Apr 19, 2019, 9:30 AM IST

Updated : Apr 19, 2019, 10:56 AM IST

ठाणे - आपण नेहमी महापुरुष आणि देवीदेवतांच्या जयंत्या साजऱ्या करत असतो. मग आता लोकशाहीची जयंती साजरी करण्यासाठी निर्भयपणे मतदान करा, असे आवाहन शहरातील हनुमान भक्ताने केले आहे.

मतदान करण्याचे आवाहन करताना हनुमान भक्त

देशात सध्या लोकशाही निवडणुकांसाठी मतदान घेतले जात आहे. त्यातच ठाण्यात लोकसभा मतदारसंघात येत्या २९ एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी विविध पातळींवर मतदारांना जागृत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी देशभरात शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. तसेच विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्तेही मतदारांमध्ये जनजागृती करीत आहेत.

रामनवमी, डॉ. आंबेडकर, महावीर, हनुमान या लागोपाठ झालेल्या जयंत्या आपण देशभरात साजऱ्या केल्या. आता यानंतर लोकशाहीची जयंती येत आहे. या लोकशाही जयंती दिनी जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरातून बाहेर पडावे. आपल्या मतदान केंद्रावर जाऊन लोकशाही बळकट करण्यासाठी २९ एप्रिलला लोकशाहीची जयंती साजरी करावी, अशी विनंती एका हनुमान भक्तानी हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला केली आहे.

Last Updated : Apr 19, 2019, 10:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details