महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंबरनाथमध्ये लग्नमंडपात नवरीच्या हटके एन्ट्री; वऱ्हाडी मंडळींना बसला आश्चर्याचा धक्का, व्हिडिओ व्हायरल - अंबरनाथ

लग्नासाठी पाहुणे, नातेवाईक आणि मित्रपरिवार जमलेलेच होते. त्यातच नवरदेवही नवरीची वाट पाहत होता. नववधू हर्षदा ही स्वतः जीप चालवत आलेली पाहून नवरदेवाकडील वऱ्हाडी मंडळींसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला

नववधूने जीपमधून केलेली एन्ट्री

By

Published : May 18, 2019, 2:30 PM IST

ठाणे- लग्न म्हटले की थाट माट पाहायला मिळतो. अनेकजण यामध्ये काहीतरी वेगळेपण आण्याचा प्रयत्न करत असतात. असाच आगळावेगळा थाट अंबरनाथ पश्चिमेतील कानसई गावात पाहायला मिळाला. या लग्नातील नववधू चक्क विवाहस्थळापर्यंत स्वतः जीप चालवत आली होती. या नवरीची डॅशिंग एन्ट्री पाहून वऱ्हाडी मंडळींना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर या नवरीच्या एन्ट्रीचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे.

नववधूच्या एन्ट्रीचा व्हायरल झालेला व्हिडीओ

लग्नसोहळ्यात प्रत्येकाला काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असते. मात्र, नववधू हर्षदा हिची आणि तिच्या भावाची इच्छा लग्नमंडपात जीपमधून येऊन पूर्ण झाली आहे. अंबरनाथमधील कानसई गावातील आगरी समाजाच्या असणाऱ्या रमेश भोईर यांनी आपल्या मुलीची ही इच्छा पूर्ण केली. डॅशिंग राहण्याची आवड असलेल्या हर्षदाचे लग्न नवीमुंबईतील क्रिकेटर असणाऱ्या अनुप पाटील सोबत आनंद सागर येथे झाले. या लग्नसोहळ्यात हर्षदा स्वतः जीप चालवत आली. लग्नासाठी पाहुणे, नातेवाईक आणि मित्रपरिवार जमलेलेच होते. त्यातच नवरदेवही नवरीची वाट पाहत होता. नववधू हर्षदा ही स्वतः जीप चालवत आलेली पाहून नवरदेवाकडील वऱ्हाडी मंडळींसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, यामधून हर्षदाची आणि तिच्या भावाची दिमाखदार एंट्रीबाबतची असलेली इच्छा पूर्ण झाल्याचे पाहायला मिळाले.

आगरी समाज एक पाऊल पुढे आहे, अशी चर्चा लग्नमंडपात रंगली होती. दरम्यान यापूर्वीही एका नवरीची बुलेट चालवत लग्नमंडपातील एन्ट्री सोशल मीडियावर भलतीच गाजली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details