ठाणे -कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य सरकारने विविध धार्मिक स्थळांवर सावर्जनिक पूजा, नमाज पठण करण्यास बंदी घातली आहे. बंदी असतानाही भिवंडीतील मशिदीत सार्वजनिक नमाज पठण केल्याच्या विरोधात मस्जिद ट्रस्टींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाम अहमद खान खजिनदार, मरगुब हसन अंसारी, सदस्य मोहम्मद हबीब अंसारी, हजरत अंसारी यांच्यासह इतर ट्रस्टी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींचे नावे आहेत.
कोरोना अपडेट : भिवंडीत कलम 144 चा भंग; मशीद ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल - vioalation of section 144 bhiwandi thane
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कोठार पाऊल उचलत जमावबंदीचे आदेश दिले आहे. यामध्ये विविध मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा यांच्यासह इतर धार्मिक स्थळांवर होणारी गर्दी रोखण्यासाठी कलम 144 लागू केले आहे. मात्र, भिवंडी शहरात सार्वजनिक नमाज पाठणसाठी नागरिकांची गर्दी करण्यास मनाई असतानाही आसबीबी मस्जिदमध्ये सोमवारी दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास मस्जिदीत 50 ते 60 नागरिक एकत्र जमवून सार्वजनिक नमाज पठण केल्याने कलम १४४ चा भंग केला आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कोठार पाऊल उचलत जमावबंदीचे आदेश दिले आहे. यामध्ये विविध मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा यांच्यासह इतर धार्मिक स्थळांवर होणारी गर्दी रोखण्यासाठी कलम 144 लागू केले आहे. मात्र, भिवंडी शहरात सार्वजनिक नमाज पाठणसाठी नागरिकांची गर्दी करण्यास मनाई असतानाही आसबीबी मस्जिदमध्ये सोमवारी दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास मस्जिदीत 50 ते 60 नागरिक एकत्र जमवून सार्वजनिक नमाज पठण केल्याने कलम १४४ चा भंग केला आहे. त्यामुळे आसबीबी ट्रस्टींविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरपाल बारेला करत आहेत.
हेही वाचा -COVID-19 LIVE : बुधवारपासून आंतरराज्यीय विमानांच्या उड्डाणांवर बंदी, केंद्र सरकारचा निर्णय..