महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठरलं..! विकास दुबेचे ठाण्यातील साथीदार विमानानेच जाणार उत्तर प्रदेशला

उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड विकास दुबेचे दोन साथीदार अरविंद त्रिवेदी उर्फ गुड्डण रामविलास त्रिवेदी आणि सुशील कुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी या दोघांना शनिवारी ठाण्यातून अटक करण्यात आली. त्यांना रविवारी ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

vikas-dube-case-uttar-pradesh-police-at-thane-court
उत्तर प्रदेश पोलीस ठाणे कोर्टात दाखल.

By

Published : Jul 13, 2020, 3:10 PM IST

Updated : Jul 13, 2020, 5:13 PM IST

ठाणे- कुख्यात गुंड विकास दुबे याचे साथीदार अरविंद त्रिवेदी उर्फ गुड्डण रामविलास त्रिवेदी आणि सुशील कुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी यांची रिमांड घेण्यासाठी युपी पोलीस ठाणे कोर्टात दाखल झाले होते. न्यायालयाने 16 जुलैपर्यंत ट्रान्झिट रिमांड दिला आहे. तर मुंबई एटीएसकडून त्रिवेदी आणि सोनू तिवारी यांना विमानने घेवून जायचे का, यावर न्यायालयाने संमती दर्शवली असून आरोपींना मंगळवारी मुंबई ते कानपूर विमानाने नेण्याचे ठरले आहे.

उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड विकास दुबेचे दोन साथीदार अरविंद त्रिवेदी उर्फ गुड्डण रामविलास त्रिवेदी आणि सुशील कुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी या दोघांना शनिवारी ठाण्यातून अटक करण्यात आली. त्यांना रविवारी ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीश रश्मी झा यांनी दोघा आरोपींना 21 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मात्र, या दोन्ही आरोपींना आपलाही एन्काऊंटर होईल, अशी भीती वाटत आहे. त्यामुळे आपल्याला एअरलिफ्ट करुन उत्तर प्रदेशला न्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

दरम्यान, कोर्टात सुनावणी झाली असून अरविंद त्रिवेदी उर्फ गुड्डण रामविलास त्रिवेदी आणि सुशील कुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी यांच्या मागणीनूसार त्यांना विमानानेच उत्तर प्रदेशमध्ये नेण्याबाबत कोर्टाने संमती दिली आहे.

Last Updated : Jul 13, 2020, 5:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details