महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे पालिका आयुक्तपदी विजय सिंघल, शुक्रवारी कार्यभार स्वीकारण्याची शक्यता - ठाणे महापालिका नवे आयुक्त

महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांचा कार्यकाळ संपला. आता त्यांच्या जागी नवे आयुक्त म्हणून विजय जगदीशप्रसाद सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विजय जगदीशप्रसाद सिंघल
विजय जगदीशप्रसाद सिंघल

By

Published : Mar 19, 2020, 10:56 PM IST

ठाणे -महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या जागेवर कुणाची नियुक्ती? या प्रश्नावर आता पडदा पडला आहे. पालिकेच्या आयुक्तपदी नवे आयुक्त म्हणून विजय जगदीशप्रसाद सिंघल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

आग्रा हे जयस्वाल यांचे जन्मस्थान आहे. ते शुक्रवारी आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच नवे आयुक्त विजय सिंघल हे १९९७ च्या आयएएस बॅचचे असून यापूर्वी त्यांनी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपद भूषविले आहे. त्यानंतर साखर आयुक्त(शुगर कमिशनर) इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट आणि मुंबई पालिका अतिरिक्त आयुक्त पद भूषविले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details