ठाणे - भाजी विक्रेता चप्पल घालून ड्रममधील अद्रक साफ करत असल्याचा किळसवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भिवंडी शहरातील पद्मानगर भाजी मार्केटमधील ही घटना आहे.
चप्पल घालून ड्रममधील अद्रक साफ करत असल्याचा किळसवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला
यापुर्वीही राज्यभरातील असे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने असे किळसवाणे प्रकार रोजच घडत आहेत. सध्या भिवंडीतील व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.
हेही वाचा - ईडीने शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही - मुख्यमंत्री
या व्हिडीओत एक अद्रक विक्रेता चिखलाने माखलेली चप्पल घालून ड्रममधील अद्रक साफ करत असल्याचे दिसत आहे. एका जागृक नागरिकाला हा किळसवाणा प्रकार दिसताच त्यांनी रिक्षातून या घटनेचे चित्रीकरण केले. या भाजीविक्रेत्यावर संबधित प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.