महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Police Threat Pregnant Woman: अन् पोलिसवालाच देतोय 7 महिन्यांच्या गर्भवतीला खुनाची धमकी; म्हणतोय तुकडे करुन ॲसिडमध्ये टाकील... - श्रद्धा वालकर मर्डर केस

ठाण्यात एक पोलीस कर्मचाऱ्याने विधवा महिलेसोबत लिव्ह इन रिलेशन स्थापन केले. ती महिला सात महिन्यांची गर्भवती आहे. आता तो तिला श्रद्धाप्रमाणे (Shraddha Walkar Murder Case) तुकडे करून जीवे मारण्याची धमकी (Police Threat Pregnant Woman) देत आहे. या बातमीने पोलीस दलासह नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (victims woman live in relationship with police) होती.

Police Threat Pregnant Woman
गर्भवतीला खुनाची धमकी

By

Published : Nov 29, 2022, 8:25 PM IST

ठाणे :देशात सध्या श्रद्धा वालकर प्रकरण (Shraddha Walkar Murder Case) गाजत असतानाच त्यातून धडा घेत आता अशा अनेक पीडित महिला पुढे येऊ लागल्या आहेत. परंतु ठाण्यात समोर आलेल्या एका प्रकरणात चक्क एक पोलिस कर्मचारीच सात महिन्यांची गर्भवती (Police threat to kill pregnant woman) असलेल्या पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी (Police Threat Pregnant Woman) देत आहे. या बातमीने पोलीस दलासह नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (victims woman live in relationship with police) होती.

पीडित महिला


विधवा महिला अडकली लिव्ह इन रिलेशनशिपच्या जाळ्यात :ठाण्यात राहणाऱ्या 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेची हत्या करून तुकडे करून फेकण्याची धमकी दिली जात आहे. २०१४ साली आपल्या पतीच्या निधनानंतर मुलांचे संगोपन करण्याचे कठीण काम तिच्या अंगावर पडले. तीन मुली आणि एक मतिमंद मुलगा असा संसाराचा गाडा ओढणी तिला कठीण जात होते. त्यातच तिची ओळख आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांशी झाली आणि ती दोघेही लिव इन रिलेशनशिप मध्ये राहू लागली. त्यांच्यामध्ये भांडण होऊन आरोपी हा तिला जिवे मारण्याची धमकी देऊ लागला.

तुझे तुकडे करून ॲसिडमध्ये टाकील :तुझे तुकडे करून ॲसिडमध्ये टाकून ते विरघळून टाकेन अशा प्रकारच्या माणूस धमक्या देत असल्याने घाबरलेल्या पिढीतेने वर्तक नगर पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन तक्रार नोंदवली; परंतु कासारवडवली पोलिसांनी आरोपीला बोलवून फक्त समज देऊन सोडून दिल्याने पीडित महिला आणि तिच्या मुलांच्या जीवनात धोका निर्माण झाला आहे. आपण सचिन वाजे या पोलीस अधिकाऱ्याच्या बंदोबस्ताला जेलमध्ये असून आपली वरपर्यंत ओळख असल्याने आपले कोणीच काही करू शकत नाही अशी धमकी देखील आरोपीने पीडितेला दिल्याचे तिने सांगितले.


पोलीस म्हणतोय, माझी वरपर्यंत ओळख :आरोपीहा वारंवार मारहाण करताना सचिन वाजे यांचे नाव घेत होता आणि त्यांनी ज्याप्रमाणे हद्द केली आहे तशी तुझी हत्या करीन अशा प्रकारे धमकी देत होता यादरम्यान आरोपी हा आपल्याला वारंवार जबर मारहाण करत असल्याचे असल्यास आरोप देखील केला परंतु पोलीस खात्यात असलेले त्याची ओळख बघून आपण तक्रार करण्यास ठरवलं नाही असे तिने सांगितले. सध्या देशात घालत असलेल्या श्रद्धा वालकर खून प्रकरणामुळे आपले डोळे उघडले व आपली देखील श्रद्धा वालकर प्रमाणेच हत्या होईल या भीतीने आपण पोलिसात तक्रार दिल्याचे पीडिताने स्पष्ट केले. अंबादास याला लवकरात लवकर कडक शासन होऊन आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी तिने पोलिसांकडे केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details