महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात सोनारांनी विकल्या भाज्या; बाजारपेठेत अनोखे आंदोलन - ठाणे सोनार

मागील संपूर्ण वर्ष लॉकडाऊन मध्ये गेले तर यावर्षी पुन्हा आता मिनी लॉकडाऊन जाहीर केल्याने सोन्या चांदीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र, फळे आणि भाजीपाला विकण्यास परवानगी आहे. त्यामुळे भाजी विकत सरकारचा निषेध करत आहोत. अशी प्रतिक्रिया सोनारांनी दिली आहे.

सोनार आंदोलन
सोनार आंदोलन

By

Published : Apr 9, 2021, 3:26 PM IST

Updated : Apr 9, 2021, 3:45 PM IST

ठाणे -शहरातील सोन्या चांदीचे व्यापारी आता नवीन व्यवसायाकडे वळले आहेत. फळे आणि भाजी विकायला सुरुवात केली आहे. मागील संपुर्ण वर्ष लॉकडाऊन मध्ये गेले तर यावर्षी पुन्हा आता मिनी लॉकडाऊन जाहीर केल्याने सोन्या चांदीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र, फळे आणि भाजीपाला विकण्यास परवानगी आहे. त्यामुळे भाजी विकत सरकारचा निषेध करत आहोत. अशी प्रतिक्रिया सोनारांनी दिली आहे. ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत अनेक सोनारांची दुकाने आहेत. मागिल वर्षभरात कोणत्याही प्रकारे व्यवसाय झाला नाही आणि त्यात सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहक नाही. आता लॉकडाऊन लावल्यावर काय व्यवसाय करावा? असा सवालही सोनारांनी उपस्थित केला आहे.

सोनारांनी विकल्या भाज्या

पहिल्या लॉकडाऊमध्ये मोठे नुकसान
मागील वर्षी ग्राहकांनी ऑर्डर दिल्यानंतर लॉकडाऊन लागला. सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. तेव्हा ग्राहक कमी होऊ नये, या साठी नुकसान सहन करून व्यवसाय टिकवला. मात्र, आता पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती आहे. अशी प्रतिक्रिया व्यावसायिकांनी दिली आहे. सरकारने लवकर यावर तोडगा काढवा अशी विनंतीही यावेळी त्यांनी केली आहे.

Last Updated : Apr 9, 2021, 3:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details