नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committee) १०० जुडयांप्रमाणे मेथी,पालक शेपूच्या दरात १८०० रुपयांची वाढ झाली आहे. कोथिंबीरच्या दरात ४००० ते ८५०० रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. कोथिंबीरचे भाव गगनाला भिडलेले पाहायला मिळाले.सद्यस्थितीत १०० जुड्यांप्रमाणे कोंथिबीर १२ हजार रुपये दराने विकली जात आहे. मिरचीच्या दरात ८०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. पावटा व वांग्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे.कोबीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. फ्लॉवरच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. एकंदरीतच सर्वच भाज्यांच्या किंमती वाढलेल्या पाहायला मिळाल्या. अवकाळी पावसाचा फटका विशेषतः पालेभाज्यांना बसल्याने या भाज्यांच्या किंमती (Vegetables Rates Today in APMC Market) वाढल्या.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे (Vegetables Rates) :
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४००० रुपये ते ५००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,४४०० रुपये ते ४८०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३४०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ७०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४७०० ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४५०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २६०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३०००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ९००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते ३००० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये