महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गाडीच्या काचा फोडून लॅपटॉप चोरणारा महाठग गजाआड, वाशी पोलिसांची कारवाई - वाशी पोलीस ठाणे बातमी

नवी मुंबई परिमंडळ १ मधील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उच्चभ्रू वस्त्यांमध्ये गाडीच्या काचा फोडून त्यातील लॅपटॉप चोरीचे गुन्हे वारंवार घडत होते. या प्रकरणी वाशी पोलिसांनी सापळा रचून या महाठगाला अटक केली असून २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गाडीच्या काचा फोडून लॅपटॉप चोरणारा महाठग गजाआड
गाडीच्या काचा फोडून लॅपटॉप चोरणारा महाठग गजाआड

By

Published : Feb 25, 2020, 11:13 AM IST

नवी मुंबई -वाशी परिसरातील उच्चभ्रू वस्तीत गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉप, बॅग, मोबाइल आणि इतर साहित्यांची चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला वाशी पोलिसांनी गजाआड केले आहे. रवींद्र कुमार संताराम गौड(३७) असे या आरोपीचे नाव असून त्याला २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गाडीच्या काचा फोडून लॅपटॉप चोरणारा महाठग गजाआड

नवी मुंबई परिमंडळ १ मधील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उच्चभ्रू वस्त्यांमध्ये गाडीच्या काचा फोडून त्यातील लॅपटॉप चोरीचे गुन्हे वारंवार घडत होते. हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ माने यांच्या नेतृत्वाखाली २०१९ व २०२० या कालावधीत चोरी झालेले लॅपटॉप शोधण्यासाठी एक पथक नेमण्यात आले होते. त्यानुसार, वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संबधित पथकाने सापळा रचून मानखुर्द येथे राहणारा आरोपी रवींद्रकुमार संताराम गौड या महाठगाच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून १ लाख ७५ किंमतीचे ९ लॅपटॉप हस्तगत करण्यात आले असून २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का, याचीही माहिती पोलीस त्याच्याकडून घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details