ठाणे :एकीकडे प्रेमाचा सण समजला जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात असताना दुसरीकडे मात्र, तरुणींची छेड काढणाऱ्या मजनूंची काही कमी नाही. काही तरुणींना त्रास सहन करतात. पण, काही अशा असतात की त्या मजनूला आयुष्यभर अद्दल घडवतात. व्हॅलेंटाईन 'डे'ला काहीतरी तुफानी करायला गेलेल्या अशाच एका मजनूला दोन तरुणींनी मिळून चांगलीच धुलाई केली. हा प्रकार कल्याण नजीक वडवली गावात घडला असून तरुणीची छेड काढणाऱ्या त्या मजनूला बेदम चोप देण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल :कल्याण - कसारा मार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकानजीक वडवली गाव आहे. या गावातील एका तरुणीची छेड काढणाऱ्या त्या मजनूला पीडित मुलीच्या नातेवाईकाने पकडून घरानजीक आणले. त्यानंतर पीडित दोन तरुणींनी नातेवाईकांसमोर बेदम चोप दिला. तरुणीने मजनूला लाथा बुक्क्यांसह झाडूनेही बेदम मारहाण केल्याचे व्हिडओ मधून दिसत येत आहे. पीडित तरुणी त्या मजनूला मारहाण करतानाचा सर्व प्रकार एका मोबाईल कैमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.