महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात चोख पोलीस बंदोबस्तात कैद्यांचे लसीकरण - ३ हजार ७२० कैदी लसीकरण

कैद्यांना लसीकरण करण्याची मोहीम जेल प्रशासनाने सुरु केली आहे. अवघ्या ८० कैद्यांचे आतापर्यंत लसीकरण करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

ठाणे पोलीस
ठाणे पोलीस

By

Published : Apr 6, 2021, 4:57 PM IST

ठाणे -फ्रंट लाईन वर्कर्स पाठोपाठ ४५ वर्षावरील ठाणेकरांना लसीकरण करण्याची मोहीम सुरु आहे. यात ठाणे कारागृहातील ३ हजार ८०० कैद्यांपैकी ८० कैद्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. अत्यंत चोख पोलीस बंदोबस्तात या कैद्यांचे लसीकरण सिव्हिल रुग्णालयात करण्यात येत आहे. तर संपूर्ण कैद्यांचे लसीकरण करण्याचा मानसही प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

डॉ. कैलास पवार
ठाणे मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा धोका वाढल्यानंतर २०२० या वर्षात विविध कारागृहातून अनेक कैद्यांना रजेवर सोडण्यात आले होते. तर काहींना जामीन मंजूर करण्यात आला होता. ठाणे मध्यवर्ती कारागृहात सद्यस्थितीत ३ हजार ८०० कैदी विविध गुन्ह्यात बंदिस्त आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावातून ठाणे कारागृहही सुटले नाही. कैद्यांना लसीकरण करण्याची मोहीम जेल प्रशासनाने सुरु केली आहे. मात्र, कैद्यांना लसीकरणासाठी बाहेर काढताना काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळेच आत्ता पर्यंत अवघ्या ८० कैद्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

तर हे काम जोखमीचे
लसीकरणासाठी कैद्यांना बाहेर काढत कैद्यांचे लसीकरण करण्यासाठी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात आणले जात आहे. कारागृहातून कैद्यांना आणण्यासाठी जेल प्रशासनाला मोठा बंदोबस्त तैनात करावा लागत आहे. एका वेळेस २० कैद्यांना लसीकरणासाठी बाहेर आणले जात आहे. त्यात सिव्हिल रुग्णालयातही कर्मचारी तैनात करावा लागत आहे. त्यामुळे ही बाब मोठ्या जोखमेची मानली जात आहे.


३ हजार ७२० कैदी लसीकरणाच्या प्रतिक्षेत
ठाणे कारागृहात बंदिस्त असलेले ३ हजार ८०० कैदी हे विविध गुन्ह्यातील कैदी आहेत. यात काही कैदी हे अंडरटेन कपात आहेत. त्यांना वेळोवेळी न्यायालयीन सुनावणीसाठी हजर करावे लागतात. तर काही कैदी हे न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा भोगत आहेत. न्यायालयीन सुट्टीत मोठ्या बंदोबस्तात २० कैद्यांचे लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती आहे. ठाणे कारागृहातील तब्बल ३ हजार ७२० कैदी अजूनही लसीकरणाच्या प्रतिक्षेत आहेत.

हेही वाचा-आरोग्यमंत्र्यांची अचानक मालेगावला भेट; सामान्य रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयांची केली पाहणी

ABOUT THE AUTHOR

...view details