ठाणे -महिलांना सुलभरित्या कोरोना प्रतिबंधक लस घेता यावी, यासाठी महापालिकेच्यावतीने टेंभी नाका येथे महिलांसाठी विशेष लसीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. अनेक महिला या नोकरीनिमित्ताने तसेच मोलमजूरीच्या कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असतात. त्यामुळे या महिलांना लसीकरण केंद्रावर वेळेत पोहचणे कठीण होते. परिणामी आजवर ठाणे शहरात झालेल्या एकूण लसीकरणाच्या आकडेवारीत महिलांची आकडेवारी कमी आहे. महिलांना त्यांच्या वेळेनुसार लस घेता यावी यासाठी ठाण्यातील टेंभीनाका येथील शाळा क्र. 12मध्ये दिवसभर दोन सत्रात सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत स्वतंत्र महिलांसाठी लसीकरण केंद्र आजपासून सुरू करण्यात आले.
ज्या प्रमाणात लस महापालिकेकडे उपलब्ध होेईल, त्याप्रमाणात इतर ठिकाणीसुद्धा दोन सत्रात लसीकरण केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचेही महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच गर्भवती महिलांचेही लसीकरण प्राधान्याने होण्याच्या दृष्टीने लसीकरण केंद्रावर त्यांना प्रथम प्राधान्य देऊन लस दिली जात आहे. तरी गर्भवती महिलांनीही आपले लसीकरण करुन घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. आज लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी लसीकरणासाठी महिलांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.
ठाणे जिल्ह्यात २९ हजार नागरिकांचे लसीकरण -