ठाणे -कोरोनाच्या धास्तीने नागरिकांची मास्क खरेदीसाठी देशभरात झुंबड उडाली होती. याचाच फायदा घेत काही समाजकंटकांनी विदेशात वापरलेले मास्क धुवून पुन्हा विक्रीचा गोरखधंदा सुरू केल्याचे एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले होते. याची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंगे यांनी आज (रविवारी) दुपारच्या सुमारास गोदामावर छापा टाकून शेकडो गोण्यामधील मास्कचा पर्दाफाश केला आहे. भिवंडी तालुक्यातील पूर्णा येथील परसनाथ कंपाऊंड येथे हा फसवणुकीचा धंदा चालू होता.
'कोरोना' प्रतिबंधासाठी विदेशात वापरलेल्या ‘त्या’ मास्क विक्रीच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश
काही समाजकंटकांनी विदेशात वापरलेले मास्क धुवून पुन्हा विक्रीचा गोरखधंदा सुरू केल्याचे एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले होते. त्यानंतर डॉ. मनीष रेंगे यांंच्या आरोग्य पथकाने पोलीस बंदोबस्तात गोदामावर छापेमारी करीत शेकडो गोण्यामधील माक्सचा विल्हेवाट लावली आहे.
व्हायरल व्हिडिओचे गांभीर्य ओळखून भिवंडीचे पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांनी व्हिडिओची तपासणी केली. त्यांना हा प्रकार भिवंडी पोलीस परिमंडळ २ च्या हद्दीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना ७ मार्च रोजी संबंधित गोदामावर कारवाई करण्यासाठी लेखी पत्र पाठवेल होते.
डॉ. मनीष रेंगे यांंच्या आरोग्य पथकाने पोलीस बंदोबस्तात गोदामावर छापेमारी करीत शेकडो गोण्यामधील माक्सचा विल्हेवाट लावली आहे. दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूची दहशत पसल्याने त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी बहुतांश नागरिक गर्दीच्या ठिकाणी तोंडाला माक्स लावून फिरताना देशभरात दिसत आहे. त्यामुळे विदेशात वापरलेल्या मास्कचा साठा कमी किंमतीत घेऊन त्याला स्वछ धुवून त्या माक्सची चढ्या दरात विक्रीचा प्रयत्न काही समाजकंटकांनी करीत नागरिकांनाच्या जीवाशी खेळ मांडला होता. मात्र त्या व्हायरल व्हिडिओमुळे समाजकंटकांचे बिंग फुटल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा मोठा अनर्थ टळला.
हेही वाचा -महिला दिन विशेष: आदिवासी महिलांच्या गोडंबी व्यवसायातील वास्तव