महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rain In Thane : भिवंडी ग्रामीण भागात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचे तांडव; घरांसह झाडांची पडझड - Unseasonal rain with gale in Bhiwandi

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे परिसरातील अनेक घरांचे छत उडाले तर काही परिसरात वृक्ष कोलमडून पडले. यामध्ये काही नागरिक जखमीही झाले.

Stormy Rain In Thane District
अवकाळी पाऊस

By

Published : May 30, 2023, 4:49 PM IST

ठाणे: जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा पडघा-बोरिवली भागातील घरांना सर्वाधिक फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची छपरे उडाली. तर काळी भागात झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.


वीट उत्पादकांचे नुकसान: ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे स्थानिक वीट उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ते हवालदिल झाले आहेत. तयार विटांवर प्लास्टिक टाकण्यासाठी वीट उत्पादकांना मोठी धावाधाव करावी लागली. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान विचारात घेता शासनाने वीटभट्टी मालकांना नुकसान भरपाई द्यावी, असे मागणी वीट उत्पादकांकडून केली जात आहे. दुसरीकडे वादळी पावसाचा फटका मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीला बसल्याने वाहतूक मंदावली होती.


रस्त्यांवर साचले पाणी:मार्च महिन्यात ३ वेळा झालेल्या अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला अक्षरश: झोडपून काढले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची आणि फळबागांची नासाडी झाली होती. आज पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. तर काही ठिकाणी रस्ते चिखलमय झाले होते. या रस्त्यांहून मार्ग काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली.

वीटभट्टीचे मोठे नुकसान:ठाणे जिल्ह्यात याआधीसुद्धा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भाजीपाला लागवड करणारा शेतकरी संकटात सापडले होते. पण वीटभट्टी मालक देखील दुहेरी संकटात सापडले आहेत. एका बाजूने वीटभट्टी मजूरकरांनी बनवलेल्या कच्च्या विटांचा मोबदला देत असतानाच अवकाळी पावसामुळे बनवलेल्या लाखो कच्या विटा पावसाच्या पाण्यात विरघळून गेल्या आहेत. यामुळे वीटभट्टी उत्पादन दुहेरी संकटात सापडले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

विविध आजारांना निमंत्रण: अवकाळी पाऊस पडताना विजा देखील चमकत होत्या. त्यातच आदींच हिवाळ्यातील गारठ्याने नागरिक रात्रीच्या वेळी कुडकडत असतानाच या अवकाळी पाऊस असल्याने अधिक गारठा वाढण्याची भीती आता नागरिक व्यक्त करत करण्यात आली असून विविध आजारांनी हा अवकाळी पाऊस निमंत्रण देणार असल्याचे दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details