महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Physical Abuse Of Minor Boy : कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, ४० वर्षीय नराधमाला अटक - गुंगीचे औषध देऊन अनैसगिक अत्याचार

ठाणे जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी एका 40 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याची रवानगी आज पोलीस कोठडीत करण्यात आली.

४० वर्षीय नराधमाला अटक
४० वर्षीय नराधमाला अटक

By

Published : Mar 30, 2023, 5:45 PM IST

ठाणे : ठाण्यात गुन्हेगारीच्या घटना अलिकडच्या काळात वाढल्याचे दिसून येत असतानाच आणखी एक अशीच घटना घडली आहे. या घटनेत मुलावरच अनैतिक अत्याचार करण्यात आले आहेत. एका १७ वर्षीय पीडित मुलाला बाहण्याने लॉजवर नेऊन ४० वर्षीय नराधमाने या पीडित मुलाला थंड द्रव्यात गुंगीचे औषध देऊन अनैसगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नरधामावर पोक्सोसह अनैसगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. रितेश दुसाने असे अटक नरधमाचे नाव आहे.



पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगा अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका भागात कुटुंबासह राहतो. तर नराधम आरोपी हा कल्याण पूर्वेतील पिसवली गावात राहतो. त्यातच २९ मार्च (बुधवारी ) सकाळच्या सुमारास पीडित मुलगा घरानजीक असताना, नराधम आरोपी त्या ठिकाणी स्कुटी घेऊन आला होता. त्यावेळी पीडित मुलाला बहाण्यानें स्कुटीवर बसून कल्याण पूर्वेतील एका लॉजवर घेऊन आला होता. त्यानंतर लॉजच्या खोलीत पीडित मुलाला थंड द्रव्यात गुंगीचे औषध देऊन दोन वेळा अनैसगिक अत्याचार केला. शिवाय लैगिंक अत्याचार केले. या धक्कादायक घडललेल्या घटनेमुळे पीडित अल्पवयीन मुलगा भयभीत झाला असतानाच, नराधम आरोपीने त्याला घडललेल्या प्रकारची कुठे वाचता केल्यास, ठार मारण्याची धमकी दिली होती.

पीडित अल्पवयीन मुलाने नरधमाच्या तावडीतून कशीबशी सुटका करत आपले घर गाठून त्यावर घडलेल्या प्रकार त्याने आईला सांगताच, तिला धक्काच बसला. त्यानंतर पीडित मुलाला घेऊन आईने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार देत, नरधामावर भादंवि, कलम ३७७, ५०६, आणि पोक्सो कायदा कलम ४, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारावर नराधमाचा शोध घेऊन घटनेच्या दिवशीच सायंकाळच्या सुमारास त्याला अटक केली. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले होत. त्यावेळी त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक सहाय्यक पोलीस निरीक्षक , माने करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details