ठाणे - भिवंडी तालुक्यातील धामणगावच्या हद्दीत एका 30 ते 35 वर्षे वयोगटातील अनोळखी महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने मृतदेह गवतात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अनोळखी महिलेच्या नातेवाईकांसह हत्येतील आरोपींचा शोध भिवंडी तालुका पोलीस घेत आहेत. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडीच्या धामणगावजवळ गवतात सापडला अनोळखी महिलेचा मृतदेह - ठाणे पोलीस बातमी
भिवंडी तालुक्यातील धामणगावजवळ गवतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे. याप्रकरणी अज्ञतांविरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संग्रहीत छायाचित्र
भिवंडी तालुक्यातील धामणगावच्या हद्दीत मुंबई-नाशिक महामार्गावरून धापसी पाड्याकडे जाणाऱ्या पायवाटेच्या रस्त्यातील गवतात हा मृतदेह शनिवारी (दि. 26 सप्टें.) रात्रीच्या सुमारास आढळला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात भा.दं.वि.चे कलम 302 व 201 प्रमाणे अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -भिवंडी-वसई रस्त्यावरील खड्ड्याने घेतला कला दिग्दर्शकाचा बळी