ठाणे- अनोळखी तरुणीने शहरातील स्कायवॉकवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तीन हात नाका जंक्शनजवळ हा अपघात झाला.
ठाण्यात स्कायवॉकवरून उडी मारून तरुणीची आत्महत्या - thane suicide
ठाण्यातील तीन हात नाका जंक्शनजवळील स्कायवॉवर चढून एका तरुणीने आत्महत्या केली. मात्र, तरुणीची ओळख अद्यापही पटलेली नाही.

प्रातिनिधिक छायाचित्र
मृत तरुणीचे वय जवळपास २० वर्ष आहे. तिने मॉलजवळील स्कायवॉकवर चढून उडी घेतली. त्यानंतर तिला रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मात्र, मृताची ओळख अद्यापही पटलेली नाही. त्यासाठी कुठल्या पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल झाली होती का? याबाबत पोलीस तपास करीत असल्याचे पोलीस निरीक्षक ए. एस. पठाण यांनी सांगितले.